नवी दिल्ली : सुप्रसिद्ध बॉलिवूड स्टार आमिर खान याने असहिष्णूतेवर दिलेल्या वक्तव्यावर राजकारण आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजल्यानंतर आता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट स्नॅपडीललाही फटका बसला आहे.
आमिर खान स्नॅपडीलचा ब्रँड अम्बेसेडर आहे, त्यामुळे या साइटला फटका बसला आहे.
देशातील वातावरणाने पत्नी घाबरली आहे आणि तिने देश सोडल्याबद्दल इच्छा व्यक्त केली आहे.
आमिरच्या या वक्तव्याने सर्वत्र खळबळ माजल्यानंतर सोशल मीडीयावर प्रतिक्रिया येत आहे. त्यात स्नॅपडीलला फटका बसला आहे.
आमिर खान विरोधात स्नॅपडीलचे युजर प्लेस्टोअरवर आले आणि त्यांनी स्नॅपडीलच्या अॅपला १ स्टार रेटिंग दिली आणि स्नॅपडीलच्या ब्रँड अम्बेसेडर पदावरून आमिरची हाकालपट्टी करावी अशी मागणी केली.
आमिर खानच्या वक्तव्यावर आलेले ट्विट पुढील प्रमाणे
Uninstalling @snapdeal app from my mobile phone. Credit goes to #AamirKhan
— Amit Jaiswal Jain (@ArkJaiswal) November 24, 2015
- स्नैपडील के साथ कोई डील नहीं क्योंकि गद्दार आमिर वहां है!!!!
- ब्रांड अंबेस्डर आमिर खान के खिलाफ विरोध करते हुए एप को इंस्टॉल कर रहे हैं
- कृपया अपने ब्रांड अंबेस्डर को देश संबंधित दिए गए बयान के लिए माफी मांगने को कहें
- जब तक आमिर खान आपका ब्रांड अंबेस्डर होगा हम यहां शॉपिंग नहीं करना चाहते हैं
- एप को अनइंस्टॉल कर दिया है, स्नैपडील हम तुम्हें पसंद करते हैं पर तुम्हारे अंबेस्डर आमिर खान को नहीं साथ ही अपील है कि प्लीज इस तरह के भारत विरोधियों का बहिष्कार करें।
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.