मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल सज्ज झालं आहे. रिलायन्स जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी एअरटेलनं त्यांच्या 4G इंटरनेटचा स्पीड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना 135 MBPSपर्यंत इंटरनेट स्पीड मिळणार आहे. इतर 4G नेटवर्कपेक्षा हा स्पीड सर्वाधिक आहे.
रिलायन्स जिओच्या इंटरनेट स्पीडच्या तुलनेत एअरटेलच्या 4Gचा स्पीड 40 ते 80 टक्क्यांपर्यंत जास्त असणार आहे. रिलायन्स जीओमुळे एअरटेल, व्होडाफोन आणि आयडीयानं त्यांच्या इंटरनेट डेटा प्लॅनच्या किंमतीमध्ये 67 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.