आयफोन ग्राहकांसाठी 15,000 रुपयांचा मोफत 4 जी डाटा!

येत्या 6 ऑक्टोबरपासून आयफोनचे सर्वात लेटेस्ट मॉडेल 6 एस आणि 6 एस प्लस भारती एअरटेलच्या रिटेल दुकानांमध्ये विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे. 

Updated: Oct 13, 2015, 05:05 PM IST
आयफोन ग्राहकांसाठी 15,000 रुपयांचा मोफत 4 जी डाटा! title=

नवी दिल्ली : येत्या 6 ऑक्टोबरपासून आयफोनचे सर्वात लेटेस्ट मॉडेल 6 एस आणि 6 एस प्लस भारती एअरटेलच्या रिटेल दुकानांमध्ये विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे. 

भारती एअरटेलच्या तब्बल 235 दुकानांमध्ये हे फोन विक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत. शिवाय, हा क्षण सेलिब्रेट करण्यासाठी भारती एअरटेलची 57 दुकानं रात्रीही सुरु राहणार आहेत. 

याशिवाय, भारती एअरटेलकडून भारतीय ग्राहकांना 'आयफोन इन्फिनिटी' प्लानच्या माध्यमातून 4जी नेटवर्कही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला 5 जीबी फोरजी डाटा ग्राहकांना मोफत मिळणार आहे. यामुळे, ग्राहकांचा मासिक बिलात 15,000 रुपयांची बचत होणार आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी व्होडाफोननं 16 ऑक्टोबरपासून आयफोन 6एस आणि 6 एस प्लस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. यामध्ये ग्राहकांना सहा महिन्यासाठी 8,885 रुपयांचा मोफत डाटा आणि व्हाईस सेवेचा लाभ घेता येणार आहे, असंही कंपनीनं जाहीर केलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.