अवघ्या ६५० रुपयांमध्ये विकला जातोय एलजीचा स्मार्टफोन

अमेरिकन रिटेलर वॉलमार्टवर ट्रॅकफोन ब्रांडचा अँड्रॉइड एलजी स्मार्टफोन $९.८२ म्हणजे अवघ्या ६५० रुपयांमध्ये मिळतोय. सोबतच अमेरिकेत शिपिंग फ्री सुद्धा दिली जातेय. मात्र यात अँड्राइडचं जुनं वर्जन किट कॅट आहे. पण त्याचं स्पेसिफिकेशन आयफोन (iphone3G) पेक्षा चांगलं आहे.

Updated: Nov 17, 2015, 12:33 PM IST
अवघ्या ६५० रुपयांमध्ये विकला जातोय एलजीचा स्मार्टफोन title=

मुंबई: अमेरिकन रिटेलर वॉलमार्टवर ट्रॅकफोन ब्रांडचा अँड्रॉइड एलजी स्मार्टफोन $९.८२ म्हणजे अवघ्या ६५० रुपयांमध्ये मिळतोय. सोबतच अमेरिकेत शिपिंग फ्री सुद्धा दिली जातेय. मात्र यात अँड्राइडचं जुनं वर्जन किट कॅट आहे. पण त्याचं स्पेसिफिकेशन आयफोन (iphone3G) पेक्षा चांगलं आहे.

LG Lucky 3G स्मार्टफोनमध्ये ३.८ इंचची स्क्रीन, १.२ GHz ड्यूल कोर प्रोसेसर आणि ३ मेगापिक्सेल कॅमेरा दिलाय. याशिवाय सोबत ४जीबी मायक्रो एसडी कार्ड पण आहे, जो फोनमध्ये टाकून दिलाय. फोनची मेमरी कार्डद्वारे आणखी ३२जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

आणखी वाचा - व्हॉटस अॅपचं सेटिंग्ज करा, पैशांसह बॅटरीही वाचवा

कंपनीचा दावा आहे की याची बॅटरी ९.९ दिवस स्टँडबाय बॅकअप सोबत ७.३ तासांचा टॉकटाइम देईल.

या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय आणि ब्लूटूथ दिलंय. सोबतच यात प्रोक्सिमिटी सेंसर आणि MP3 प्लेअर दिलंय.

सध्या हा स्मार्टफोन वॉलमार्टच्या वेबसाइटवर Sold Out आहे. पण बातम्यांनुसार वॉलमार्ट स्टोरमध्ये अजूनही उपलब्ध आहे. यात अँड्रॉइडचं नवं अपडेट वर्जन मिळणार नाही. 

आणखी वाचा -  स्मार्टफोननंतर आता येणार 'सुपरफोन'!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.