www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नुकतंच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेले कॉलेजियन्स दंग झालेत ते नव्या कॉलेजच्या नव्या अनुभवांसाठी, आपापल्या कॉलेज फेस्टिव्हल्सच्या तयारींसाठी... अशामध्ये प्रत्येक ‘कॉलेज गर्ल’ला आपण इतरांपेक्षा काही खास आणि वेगळं दिसावं, प्रत्येक इव्हेंटसाठी काही तरी खास करावं, अशी इच्छा असते.
नव्या ड्रेसची खरेदी, त्यावर मॅचिंग ज्वेलरी, सॅन्डल्स किंवा आणखीन काही तरी... पण, हे सगळं खूप खर्चिक ठरतं... आपल्यासारखाच ड्रेस आणि स्टाईल इतर कुणाहीप्रमाणे असणार आवडणार नाही... तर मग हे उपाय तुम्ही ट्राय करू शकता. पाहुयात याबद्दल काही खास टीप्स...
स्टोल्स बरोबर ठेवा
तुमच्या बॅगमध्ये कलरफुल स्टोल्स तुमच्या बरोबर ठेवा. हे स्टोल्स थोड्या ब्राईट कलरचे असतील तर उत्तमच... जर एखाद्या दुसऱ्या मुलीनं तुमच्यासारखाच कुर्ता किंवा टॉप घातला असेल तर हे स्टोल्स तुम्हाला अधिक उठावदार लूक देऊ शकतात. सध्या फ्लोरल प्रिंटची फॅशन सुरू आहे. त्यातच काळा, पिवळा किंवा गुलाबी रंगाचा स्टोल असेल तर क्या बात हो!
जंक ज्वेलरी
सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि वेगवेगळ्या मटेरिअलमध्ये तुम्हाला वेगळा लूक देणारी ज्वेलरी उपलब्ध होऊ शकते. ही ज्वेलरी बऱ्याचदा आपल्या बजेटमध्येही बसणारी असते. तुमच्या पर्समध्ये दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीची ज्वेलरी ठेवा. वेगवेगळ्या वेळी तुम्ही ही तुम्हाला हवी तशी वापरू शकता.
मेकअप कसा कराल
जास्त भडक रंगाचा मेकअप न करता लाईट कलरचा मेकअप करावा. नॅचरल लूक सर्वात उत्तम ऑप्शन आहे. सध्या मेकअपमध्येही नारंगी, फ्लोरोसंट ग्रीन कलरची चर्चा आहे. त्यांनाही तुम्ही ट्राय करू शकता.
बोल्ड इमेजपासून लांब राहा
कॉलेजमध्ये सुरुवातीपासूनच बोल्ड इमेजपासून थोडं लांब राहा. ब्राईट कलरचे शॉर्टस आणि कलरफूल कॅप्रीऐवजी लाँग स्कर्टचा ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता. जास्त बडबड किंवा प्रत्येक गोष्टीत आपलं म्हणणं पुढे पुढे करण्यापासूनही लांब राहा. नव्या फ्रेडसबरोबर एक विशिष्ट अंतर जरूर ठेवा ज्यामुळे तुमची पर्सनॅलिटी त्यांच्यासाठी इतरांपेक्षा वेगळी ठरू शकेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.