मुंबई : फेसबूक आणि व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जगात मोठी आहे. आज व्हॉट्सअॅपमुळे फेसबूकवर चॅट करणं जरा कमीच झाले आहे. तरीही फेसबूकवर जाणाऱ्यांची संख्या ही अजूनही जास्त आहे. पण त्याच पण दोघंही तुम्हाला एकत्र पहायला मिळणार आहे.
फेसबूककडेच व्हॉट्सअॅपची मालकी असल्याने आता फेसबूक आणि व्हॉट्सअॅप एकमेकांना जोडले जाणार आहेत. व्हॉट्सअॅप अकाऊंटला फेसबूक अकाऊंटशी जोडण्याचं काम मोठ्या जोराने सुरू आहे. या कामामुळेच आज काही वेळ व्हॉट्सअॅप डाऊन होतं.
व्हॉट्सअॅप अकाऊंट फेसबूकशी कनेक्ट झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवरील स्क्रीनशॉट्स, व्हिडीओ, फोटो इत्यादी थेट तुम्ही फेसबूकवर शेअर करू शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला वेगळं अॅप्लिकेशन ओपन करण्याची गरज पडणार नाही. अँड्रॉईड डेव्हलपर जेवियर सँटॉसने एक व्हॉट्सअॅप स्क्रीन शॉट शेर केला आहे, ज्यामध्ये या नव्या फीचर्सची एक झलक तुम्हाला पाहायला मिळेल.