मुंबई: फेसबुकनं जगभरातील देशांमध्ये आपल्या मॅसेंजर अॅपवर व्हिडिओ कॉलिंग फीचर लॉन्च केलंय. फेसबुकनं एक महिन्यापूर्वी पहिले हे फीचर अमेरिका, कॅनडा आणि फ्रान्ससह 18 देशांमध्ये लॉन्च केलं होतं. आता संपूर्ण देशात हे लॉन्च केलंय.
फेसबुक मॅसेजिंगचे व्हॉइस प्रेसिडेंट डेविड मार्क यांनी सांगितलं की, आम्हाला सांगण्यात आनंद होतोय की, आम्ही जगभरात आपल्या मॅसेंजर अॅपवर व्हिडिओ कॉलिंग फीचर लॉन्च केलंय. यासोबतच आम्ही काही देशांमध्ये हे लॉन्च करण्याच्या प्रक्रियेवर काम करतोय. आपण आपल्या ios आणि लेटेस्ट अँड्रॉईड व्हर्जन अपडेट करून हे फीचर मिळवू शकता.
यापूर्वीपासून व्हिडिओ कॉलिंगची सुविधा मायक्रोसॉफ्ट स्काइप, गूगल हँगआऊट आणि अॅपलच्या फेसटाइमवर मिळतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.