मुंबई : प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी आज रात्री संपणार आहे. 26 सप्टेंबरपासून व्हॉट्सअॅप यूजर्सची माहिती फेसबुकला देणार आहे.
25 सप्टेंबरपर्यत यूजर्सची कोणतीही माहिती फेसबुकवर शेअर करु नये असे आदेश व्हॉट्सअॅपने दिले होते. दिल्ली हायकोर्टाने 23 सप्टेंबरला महत्त्वपूर्ण निर्णय देताना 25 सप्टेंबरपर्यंत व्हॉट्सअॅप यूजर्सची कोणतीही माहिती फेसबुकला देणार नाही असे आदेश दिले होते.
मुख्य न्यायमूर्ती जी रोहिणी आणि न्यायमूर्ती संगीता यांच्या खंडपीठाने याबाबत निर्णय दिला होता. यात 25 सप्टेंबरपर्यंत यूझर्सची खाजगी माहिती फेसबुकला न दिण्याचे आदेश दिले होते.