न्यूयॉर्क : फेसबुकवर तुम्ही चांगला आणि महत्वपूर्ण व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला त्याचे पैसे मिळू शकतात. फेसबुक कंपनीने तसे संकेत दिले आहेत.
फेसबुकवर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही कमाई करु शकता. कारण कंपनीने नवीन सजेस्टेड व्हिडिओ फिचर तयार केलेय. या फिचरच्या माध्यमातून युजर्सचे व्हिडिओ क्लिप्स आणि जाहिरात मिळून आपोआप एक व्हिडिओ तयार होईल. हा व्हिडिओ जितके जास्त लोक पाहतील त्याप्रमाणात जास्त कमाई होईल. व्हिडिओतील असलेल्या जाहिरातीमधून झालेल्या कमाईचा ४५ हिस्सा हा फेसबुकचा असेल.
फेसबुकच्या माहितीनुसार त्यांच्या संकेतस्थळावरुन रोज किमान चार अरब बार व्हिडिओ पाहिले जातात. काही तज्ज्ञांच्या मते फेसबुकवर व्हिडिओची वाढती लोकप्रियता ही युट्युबसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
आयएचएस कंसल्टेंसीच्या अॅडव्हरटायजिंग अनालिस्ट एलेनी मारौली यांनी सांगितले, व्हिडिओच्या जगात फेसबुक जास्तच आक्रमक पद्धतीने पुढे जात आहे. डिसेंबर २०१४ मध्ये फेसबुकने व्ह्युजच्याबाबात पहिल्यांदा युट्युबला पाठिमागे टाकले होते. त्यामुळे आगामी वर्षात फेसबुक युट्युबला टक्कर देऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.