जिओनीने लाँच केला पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन

मुंबई : चीनी मोबाईल कंपनी जिओनीने नुकताच भारतात थ्रीजी ड्युअल सिम स्मार्ट  पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन लाँच केलाय. हा फोन सामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आणला आहे. 

Updated: Feb 2, 2016, 09:11 AM IST
जिओनीने लाँच केला पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन title=

मुंबई : चीनी मोबाईल कंपनी जिओनीने नुकताच भारतात थ्रीजी ड्युअल सिम स्मार्ट पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन लाँच केलाय. हा फोन सामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आणला आहे. त्यामुळे या फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे.

हा फोन पांढरा, काळा, पिवळा, लाल आणि निळा या रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन ५ इंचाची असून फोनला १.५ GHz चा क्वाडकोर प्रोसेसर आहे. फोनचा रॅम १ जीबी चा आहे. तर फोनची इंटरनल मेमरी १६ जीबी इतकी आहे. फोनला मायक्रो एसडी कार्ड स्लॉट असून याची मेमरी १२८ जीबी इतकी वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड लॉलीपॉपच्या अमिंगो ३.१ व्हर्जनवर चालतो.

 

फोटोग्राफीयाठी यात ५ मेगापिक्सेलचा रेयर कॅमेरा तर २ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात ब्युटिफिकेशन, फिल्टर्स, पॅनोरामा असे अनेक ऑप्शन्स आहेत. या फोनची बॅटरी २००० mAhची आहे. यात कस्टमाइज लॉक फिचरही देण्यात आलंय. कंपनीच्या दाव्यानुसार ०.५ सेकंदात हा फोन माणसाच्या चेहऱ्याची ओळख पटवून फोन अनलॉक करू शकतो.