नवी दिल्ली: टेक्नोलॉजीचा बादशाहा गूगल आता तुमच्या आवडीचं जेवण तुम्हाला देण्यासाठी तयार झाला आहे. गूगलने सर्ज ऑप्शनमध्ये 'फूड ऑर्डरिंग' हे नवं फीचर जोडलं आहे. या फीचरद्वारे यूजर आपल्या आवडीचं जेवण ऑर्डर करून मागवू शकणार आहे.
असं काम करणार हे फीचर
तुम्हाल गूगलवरून जेवण मागवण्यासाठी आपल्या आवडीच्या डिशचं नाव गूगल सर्चमध्ये टाईप करावं लागणार आहे. उदाहणार्थ- पिझ्झा, बर्गर, सॅंडविच इत्यादी. त्यानंतर हे पदार्थ तयार करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टची लिस्ट समोर येईल. या लिस्टमध्ये प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरन्टच्या वेबसाईटच्या समोर फूड ऑर्डर फीचर दिसेल. या फीचरवर क्लिक केल्यावर तुमची ऑर्डर त्या हॉटेल अथवा रेस्टॉरन्टमध्ये पोहचते. त्यानंतर त्या हॉटेलचा कर्मचारी ते जेवण तुमच्यापर्यंत पोहचवतो.
गूगल प्लसवर भेटेल माहिती
गूगलने या ऑर्डरिंग फीचरची माहिती सोशल नेटवर्किंग पेज 'गूगल प्लस'वर दिली आहे. हे फिचर सध्या अमेरिकेत लागू करण्यात आलं आहे. लवकरच भारतासह जगभरात याची सुरूवात केली जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.