मुंबई: 'मदर्स डे'च्या निमित्तानं गूगलनं अॅनिमेटेड डूडल बनवलं आहे. या अॅनिमेशनमध्ये माणासांपासून जनावरांपर्यंतच्या आई आणि मुल यांच्यामधील प्रेमाचं नातं दाखवलं आहे.
डूडलमध्ये गूगलच्या दुसऱ्या 'ओ'मध्ये मोशन देण्यात आलं आहे. यावर क्लिक केल्यावर प्रथम बदक आपल्या पिल्लांची देखभाल करतांना दिसत आहे. त्यानंतर एका रडणाऱ्या वाघाच्या पिल्लाला गप्प करतांना वाघिण दिसत आहे. त्यानंतर एक ससा आपल्या तीन पिल्लांसह खेळतांना दिसत आहे. त्यानंतर डूडल एका लहान मुलात रूपांतरीत होतं. जो मुलगा आपल्या आईकडे पळत जात आहे. आई त्या मुलाला प्रेमानं उचलून घेते.
गूगल हा डू़डल काही सेकंदांचा आहे. मात्र ज्याप्रकारे यात आई आणि मुल यांचे स्नेहसंबध दाखवण्यात आले आहेत, त्याची सर्व स्तरवर स्तुती केली जात आहे.
संपर्ण जगात आज १०१वा मदर्स डे साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये १९१४मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. १९०८ मध्ये अॅना जर्विस नामक एका महिलेनी या मोहिमेस सुरुवात केली होती आणि मागणी केली होती की मातांच्या त्याग आणि बलिदानाच्या सन्मानार्थ 'मदर्स डे' साजरा केला जावा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.