मुंबई: जर का तुम्ही माइक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या लॅपटॉपवर गूगल क्रोम वेब ब्राउजर वापरत असाल आणि लॅपटॉपची बॅटरी लवकर सपंत असेल, तर त्याचं कारण गूगल क्रोम असू शकतं.
या गोष्टीचा खुलासा फोर्ब्सवर इऑन मॉरिसनं केला आहे. त्यांनी सांगितलं की, "गूगल क्रोम दूसऱ्या इंटरनेट ब्राउजर पेक्षा जास्त बॅटरी खर्च करतो".
क्रोमच्या ज्यास्त बॅटरी खर्च करण्यामागचं कारण 'सिस्टम क्लॉक टिक रेट' आहे. क्रोमला जेव्हा ओपन केलं जातं, तेव्हा हा रेट 1 मिलीसेकंदांवर सेट होतो. पण विंडोज़वर सामान्यपणे हा रेट 15.625 मिलीसेकंद असला पाहिजे.
काय आहे हे क्लॉक टिक रेट?
विंडोज़प्रमाणे ओएसमध्ये काही ठराविक वेळेनंतर इवेंट्स सेट होतात. गरज नसताना पावर वाचवण्यासाठी प्रोसेसर स्लीप मोडमध्ये जातो आणि पूर्वनियोजित वेळेत पुन्हा स्लीप मोडमधून बाहेर येतो.
क्लॉक टिक रेटचा कसा प्रभाव पडतो?
क्रोम विंडोजमध्ये ही वेळ कमी करून 1 मिलीसेंकद करतो. म्हणजेच सिस्टम 15.625 मिलीसेकंद या वेळेच्या खूप आधीच 1 मिलीसेकंदवर स्लीप मोडमधून बाहेर येतो. यावरून असं म्हणू शकतो की, एक मिलीसेकंद या रेटवर प्रोसेसर एका सेकंदामध्ये 1000 वेळा स्लीप मोडमधून बाहेर येतो आणि डिफॉल्ट मोडच्या 15.625 मिलीसेकंदमध्ये प्रोसेसर ज्यावर विेशेष लक्ष दिलं जात नाही, अशा इवेंट्सला चेक करण्यासाठी एका सेकंदामध्ये फक्त 64 वेळा स्लीप मोडमधून बाहेर येतो.
किती जलद खर्च होते बॅटरी?
माइक्रोसॉफ्टनं स्वतः असं म्हटलं आहे की, 1 मिलीसेकंद टिक रेट म्हणजे 25 टक्के जास्त पावर खर्च होते. मग दूसरे ब्राउजर किती बॅटरी खर्च करते? जर तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर (आईई)चं नवं वर्जन वापरत असाल, तर टिक रेट तेव्हापर्यंत 15.625 मिलीसेकंदच राहतो जोपर्यंत ब्राउजरला काही खास कारणापर्यंत वाढवावं लागत नाही. जेव्हा तुम्ही आईईवर यूट्यूबवर व्हिडिओ बघता तेव्हा हा रेट 1 मिलीसेंकद होतो. त्या टॅबला बंद करून फक्त इंटरनेट ब्राउजिंग करत असाल तर हा रेट पुन्हा 15.625 मिलीसेकंद होतो. पण क्रोम ब्राउजर उघडताच हा 1 मिलीसेकंद होतो आणि तोपर्यंत राहतो जोपर्यंत तुम्ही ब्राउज़र पूर्णपणे बंद करत नाही.
गूगलनं दिलयं दूरूस्त करण्याचं आश्वासन
वेब ब्राउज़रमध्ये गूगल क्रोम सगळयात ज्यास्त वापरलं जातं. जगात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांमध्ये 35 टक्के लोक गूगल क्रोम वापरतात. जर तुम्हाला चांगली बॅटरी लाइफ हवी असेल तर जोपर्यंत गूगल याला दुरूस्त करत तोपर्यंत तुम्ही दूसरे ब्राउजर वापरू शकता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.