सॅमसंगचा ‘गॅलक्सी एस5 फोर जी’ प्रिमिअम फोन

कोरियन कंपनी सॅमसंगनं एक नवा हॅन्डसेट ‘गॅलक्सी एस 5 फोर जी’ लॉन्च केलाय. जिथं जिथं फोर जी सुविधा उपलब्ध असेल तिथं तिथं हा फोन विकण्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल. 

Updated: Jul 19, 2014, 04:24 PM IST
सॅमसंगचा ‘गॅलक्सी एस5 फोर जी’ प्रिमिअम फोन title=

मुंबई : कोरियन कंपनी सॅमसंगनं एक नवा हॅन्डसेट ‘गॅलक्सी एस 5 फोर जी’ लॉन्च केलाय. जिथं जिथं फोर जी सुविधा उपलब्ध असेल तिथं तिथं हा फोन विकण्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल. 

हा फोनमध्ये 2.5 जीएचझेड क्वॉड कोर स्नॅपड्रॅगन 801 एसओसी उपलब्ध आहे. या फोनचा स्क्रीन 5.1 इंचाचा असून फूल हाय डेफिनेशन आणि सुपर एमोलेड डिस्प्ले यात उपलब्ध आहे. हा अँन्ड्रॉईड किटकॅटवर आधारीत आहे. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा फोन वॉटरप्रूफ आहे... त्यामुळे पावसाळ्यात भिजला तर खराब होण्याची चिंता नाही. या फोनला धूळ किंवा पाण्यापासून वाचविण्यासाठी यात आयपी 67 रेटिंगचा वापर केला गेलाय.   

या फोनचा रिअर कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. यात एलईडी फ्लॅश, बीएसआय आणि अल्ट्रा एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा आहे. तसंच या फोनचा फ्रंट कॅमेरा 2.1 मेगापिक्सल आहे. 

या फोनचा रॅम 2 जीबी आहे. यात 16 जीबी इंटरनल मेमरी तसंच मायक्रो एसडी कार्ड उपलब्ध आहे. यामध्ये जबरदस्त वाय-फाय देण्यात आलाय त्यामुळे तुमचा डेटा खूप वेगानं डाऊनलोड केला जाऊ शकतो.

या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यात हेल्थ आणि हार्ट सेन्सरचाही समावेश आहे. शिवाय यात स्मार्ट टिव्ही रिमोटसाठी इन्फ्रारेड एलईडीही उपलब्ध आहे. यामध्ये 2800 एमएएच बॅटरी उपलब्ध आहे.  

या फोन तीन रंगांत उपलब्ध होणार आहे. याची किंमत आहे 53,300 रुपये. ‘गॅलक्सी एस5 4जी’ 20 जुलैपासून बाजारात विक्रीसाठी उपल्बध होईल. हा फोनच्या ग्राहकांना कंपनीकडून दोन महिन्यांपर्यंत फ्री डेटा उपलब्ध करून दिला जाईल.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.