मुंबई : स्मार्टफोनच्या दुनियेत प्रत्येक दिवशी काहीना काही नवीन होत असतं. लोकांच्या अडचणी डोळ्यासमोर ठेऊन कंपन्या नावीन्याच्या शोधात असतात.
चीनच्या मॉक्सी ग्रुपने मॉक्सी नावाचाच हा स्मार्टफोन तयार केला आहे. हा जगातला पहिला हातात घालता येणारा फोन असल्याचा दा कंपनीचा आहे.
या फोनची किंमत ५१ हजार रूपये असेल, वर्षभराच्या आत हा लॉन्च होणार आहे. सुरवातीला हा फोन ब्लॅक अॅन्ड व्हाईट स्क्रीनमध्ये येणार आहे, भविष्यात रंगीत स्क्रीनसह आणला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.
फोनमध्ये फिचर्स खूप नाहीत मात्र तो अगदी कमी पॉवर वापरतो हा त्याचा मोठा फायदा आहे. लांबीला थोडा अधिक असलेला हा फोन अगदी सडपातळ आहे. त्याचा स्क्रीन थोडा अरूंद असला तरी बॅटरी मोठी आहे. हा फोल्डेबल मोबाईल स्क्रीन अॅमेझॉनच्या किडल सारखी ई इंक डिस्प्ले वाला आहे.