पोस्टातील पाच लाख बचत खातेधारकांना डेबिट कार्ड मिळणार

भारतीय डाक विभागातर्फे यंदा त्यांच्या पाच लाख बचत खातेधारकांना वैयक्तिक डेबिट कार्ड देण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत हे डेबिट कार्ड देण्यात येतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍यानं दिली. 

Updated: Jun 15, 2015, 09:41 PM IST
पोस्टातील पाच लाख बचत खातेधारकांना डेबिट कार्ड मिळणार title=

मुंबई: भारतीय डाक विभागातर्फे यंदा त्यांच्या पाच लाख बचत खातेधारकांना वैयक्तिक डेबिट कार्ड देण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत हे डेबिट कार्ड देण्यात येतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍यानं दिली. 

भारतीय डाक विभागानं गेल्या वर्षीपासून पोस्टातील बचत खातेधारकांना डेबिट कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पोस्टानं स्वतंत्र एटीएम्सचीही निर्मिती केली आहे. आतापर्यंत १० हजार डेबिट कार्ड देण्यात आले असून ते प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आल्याची माहिती पोस्टाचे उपमहानिदेशक एल. एन. शर्मा यांनी दिली. 

येत्या वर्षी पाच लाख नवे कार्ड देण्याचं उद्दिष्ट असल्याचंही शर्मा यांनी यावेळी सांगितलं. पहिल्या टप्प्यात ग्राहकांना देशभरातील २ हजार ६०० मोठ्या शाखांमध्ये कार्ड देण्यात येतील. तसंच सुरुवातीला पोस्टाच्या केवळ ११५ एटीएममध्येच त्यांचा वापर करता येऊ शकेल. पुढील मार्च अखेरपर्यंत एक हजार नवे एटीएम सुरु होतील, असंही शर्मा म्हणाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.