नवी दिल्लीः कोरिया कंपनी एलजीचा प्रिमियम फोन G3 या महिन्यात 27 तारखेला आशियामध्ये लॉन्च होणार आहे. अजूनपर्यंत या फोनची विक्री कोरियामध्ये होत होती. मात्र फोनसाठी लोकांची मागणी पाहून कंपनीनं सगळीकडे हा फोन उतरवण्याचं ठरवलं आहे.
एलजी G3 फोन 5.5 इंचाचा क्वॉड कोर फोन आहे, तसंच याची स्क्रिन क्वॉड हाई डेफिशिअन असल्यानं फोटो लाईव्ह आहेत असे वाटते. फोनमध्ये किटकॅट प्रोसेसर असून 2.5 क्वॉड कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 801 प्रोसेसर आहे.
याचा रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल ज्यात डयुएल टोन फ्लॅश आहे. याच्या व्यतिरीक्त यात लेझर असे तंत्र आहे ज्यामुळे उत्तम फोटो येण्यासाठी त्याची मदत होते. याचा फ्रन्ट कॅमेरा 2.1 मेगापिक्सल आहे. याची बॅटरी 3 हजार एमएएच आहे.
सर्वात वेगवान असलेली 4जी एलटीई सुविधा या फोनमध्ये आहे, त्यामुळं या फोनचं कम्युनिकेशन वेगवान असेल. म्हणजेच यात इंटरनेटची गति खूप वेगवान असेल आणि व्हिडिओ पण खूप कमी वेळात डाऊनलोड होऊ शकतील.
अजूनही एलजी कंपनीने फोनच्या किंमतीचा खुलासा केला नाही. लॉन्चच्या वेळी ते स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.