मुंबई : एकाच वेळी अनेक जणांशी किंवा बराच वेळ एखाद्याशी कॉन्टक्टमध्ये राहण्यासाठी व्हॉटसअप आता बऱ्याच जणांच्या सोईचं झालंय... पण, याच व्हॉटसअपवर आपण अनेकदा खाजगी असे काही मॅसेज शेअर करतो... पण, नकळत हे मॅसेज इतरांपर्यंत पोहचू नयेत, असंही आपल्याला वाटत असतं.
मग अशा वेळी व्हॉटसअपला पासवर्ड ठेवून लॉक करणं केव्हाही सोईस्कर... 'मॅसेंजर अॅन्ज चॅट लॉक' नावाचं अॅप्लिकेशन यासाठी तुमची मदत करू शकतं.
हे अॅप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर व्हॉटसअप व्यतिरिक्त तुम्ही इतर अॅप्लिकेशन्सलाही पासवर्ड ठेवून लॉक करू शकता.
यामुळे, तुमचा फोन इतरांच्या हातात पडला तरी त्यांना तुमचं व्हॉटस्अप उघडून तुमचे मॅसेज वाचता येणार नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.