मुंबई : जर तुमच्या अँड्रॉईड फोनचा डेटा मिळत नसेल, किंवा महत्वाच्या फाईल डिलीट झाल्या असतील तर घाबरू नका, हा डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअरच्या साहाय्याने परत मिळवता येऊ शकतो.
या फाईल शोधण्यासाठी फ्री तसेच पेड बरीच सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. या फाईल परत मिळवण्यासाठी सर्वात आधी डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर इंस्टॉल कराव लागेल. त्यासाठी www.7datarecovery.com वर जाऊन फ्री सॉफ्टवेअर डाऊनलोड करा.
आपला फोन डेटा केबलच्या मदतीने पीसीला जोडून घ्या. फोन जोडल्यावर सॉफ्टवेअर ओपन करून स्कॅन करा. स्कॅनिंगमध्ये हरवलेल्या डेटाची माहिती दिसेल.
तुम्हाला जो डेटा रिकव्हर करायचा असेल, त्यासमोरील बॉक्सवर क्लीक करून सेव्ह करा. आपला हरवलेला डेटा तुम्हाला परत मिळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.