मुंबई : मोबाईल घ्यायच्या विचारात असाल तर सॅमसंगनं तुमच्यासाठी खूप चांगल्या ऑफर्स आणल्या आहेत. स्वस्त स्मार्टफोन बाजारातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन श्याओमी, मायक्रोमॅक्स, वनप्लस वनला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने आपल्या गॅलॅक्सी ग्रँड मॅक्सवर २० टक्क्यांची भरभरून सूट दिलीय.
फेब्रुवारी २०१५ मध्ये सॅमसंगनं हा मोबाईल १५,९९० रूपयांना बाजारात आणला होता. नुकतीच कंपनीनं या मोबाईलची किंमत कमी करून १२,९९० केली होती. वाढती स्पर्धा लक्षात घेत कंपनीनं पुन्हा किंमत कमी केलीय. त्यामुळे आता हा मोबाईल ११,९९० ला बाजारात उपलब्ध झालाय.
एवढंच नाही तर कंपनीनं या मोबाईलच्या खरेदीवर ११,००० रूपयांच्या ऑफर्सही देऊ केल्यात. या ऑफर्स स्नॅपडील, फूडपांडा आणि यात्रा कंपनीच्या गिफ्ट कुपन स्वरूपात असतील.
या मोबाईलमध्ये ५.२५ इंच एचडी डिस्प्ले दिला गेलाय. तसंच १.२ GHz क्वाड-कोअर क्वालकॉम स्नपड्रगन ४१० प्रोसेसर सोबत १.५ जीबी रॅमही दिली आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी ग्रँडमध्ये १६ जीबी इंटर्नल मेमरी असून ६४ जीबीपर्यंत वाढवता येईल. यासोबत १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा फ्लॅशसह दिला गेलाय जो कमी प्रकाशातही चांगले फोटो देतो. ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला गेलाय.
कनेक्टिविटीमध्ये यात ३जी, LTE, वाय-फाय, मायक्रो-युएसबी, जीपीएस, ब्लूटूथ ४.० दिलं गेलय. यात रिमुव्हेबल बॅटर पण असून याचं वजन १६१ ग्रॅम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.