नवी दिल्ली : जगभरात फुलांचे विभिन्न प्रकार आढळतात. काही फूल त्यांच्या आकारामुळे अधिक सुंदर आणि आकर्षित दिसतात. सध्या असंच एक फूल व्हायरल होतय. ज्या फुलाला नारी फूल किंवा लियाथाम्बरा असं म्हटलं जातं. हे फूल एका नेक्ड महिलेच्या आकारासारखं आहे. पण याबाबतच्या सत्यते बाबत अजून काहीही माहिती नाही.
हिमालयात हे फूल येतं आणि 20 वर्षात याला एकदाच फूल येतं. असे फूल श्रीलंकामध्ये देखील सापडल्याच्या चर्चा आहेत. नेक्ड महिलेच्या आकाराचं हे फूल सोशल मीडियावर व्हायरल होतंय. यावर अनेकांनी वेगवेगळे दावे करण्यात आले आहे पण याबाबतची सत्यता अजून समोर आलेली नाही.