मुंबई : नव्याने येऊ घातलेल्या आणि बहुप्रतिक्षीत अशा ४ इंच डिस्प्ले असलेल्या आयफोनचे नाव 'आयफोन ६ सी' किंवा 'आयफोन ७ सी' असेल असे म्हटले जात होते.
Updated: Jan 13, 2016, 01:01 PM IST
मुंबई : नव्याने येऊ घातलेल्या आणि बहुप्रतिक्षीत अशा ४ इंच डिस्प्ले असलेल्या आयफोनचे नाव 'आयफोन ६ सी' किंवा 'आयफोन ७ सी' असेल असे म्हटले जात होते. पण आता याबाबतीत नवा खुलासा समोर येतोय.
चीनमधील एका विश्लेषकाच्या मते याचे नाव काहीतरी वेगळेच असण्याची शक्यता आहे. याबाबत चीनी सोशल नेटवर्क 'विबू'वर केलेल्या दाव्यानुसार लवकरच मार्केटमध्ये दाखल होणाऱ्या आयफोनचं नाव 'आयफोन ५ ई' असण्याची शक्यता आहे.
यातील 'ई'चा अर्थ 'enhanced' (सुधारित) असा असेल. २०१३ मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या 'आयफोन ५ एस' चे हे पुढील अत्याधुनिक व्हर्जन असेल, असाही दावा केला जात आहे. यातील कॅमेरा ८ मेगापिक्सलचा असेल तर तर ह्याचा प्रोसेसर A८ असेल. याचा रॅम १ जीबी असेल. हा फोन अगदी स्वस्त म्हणजे जवळपास ३,४०० रुपयांत मिळेल, असा दावाही यामध्ये करण्यात आलाय.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link