आता सेल्फीला बदला स्टिकरमध्ये!

जर तुम्ही तुमच्या मोबाईल मधल्या जुन्या स्टिकरला कंटाळला असाल, तर एक खूप मनोरंजक असं ऑप्शन आलंय. ते म्हणजे तुमचा चेहराच तुमचं स्टिकर बनू शकतं.

Updated: Jul 6, 2014, 08:31 PM IST
आता सेल्फीला बदला स्टिकरमध्ये! title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : जर तुम्ही तुमच्या मोबाईल मधल्या जुन्या स्टिकरला कंटाळला असाल, तर एक खूप मनोरंजक असं ऑप्शन आलंय. ते म्हणजे तुमचा चेहराच तुमचं स्टिकर बनू शकतं.

हो खरंच! 'लाईन मॅसेजिंग अॅप'नं एक नवीनच 'लाइन सेल्फी स्टिकर' अॅप लॉन्च केलंय. हा अॅप तुमच्या सेल्फीचं स्टिकरमध्ये रुपांतर करतो आणि तुम्ही तुमच्या सेल्फीला मॅसेजमध्ये स्टिकरच्या जागी वापरू शकता.                                            
 या अॅपमध्ये तुमच्या जवळ १३० स्टिकर मॉडल असतील ज्याच्यात तुम्ही तुमचे सेल्फी फिट करु शकता एवढंच नाही तर स्टिकर टेक्स्टमध्ये बबलचा ही वापर करता येणार आहे. 

या स्टिकर्सला तुम्ही सोशल नेटवर्क फेसबुक, ट्विटर आणि इन्स्ट्राग्रामवरही शेअर करु शकता. हे अॅप आयफोनच्या अॅपल स्टोर आणि गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.  
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.