मुंबई : लवकरच व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्संना एक खुशखबर देणार असं दिसतंय. जे युजर्स वारंवर आपला फोन बदलतात आणि त्यामुळे त्यांची चॅट हिस्टरी पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, अशा युजर्ससाठी व्हॉट्सअॅप नवीन फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
युजर्सची हीच समस्या दूर करण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅट हिस्टरीला गुगल ड्राइव्हवर स्टोअर करता येऊ शकेल, यासाठी व्हॉटसअपचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे तुम्ही कोणत्याही अॅन्ड्रॉइड फोनवर तुमची चॅट हिस्टरी अगदी सहज मिळवू शकाल.
गुगल ड्राइव्हवर तुम्ही तुमची मिडिया हिस्टरीसुद्धा स्टोअर करू शकता. मात्र, येथे तुम्ही व्हिडिओ स्टोअर करू शकत नाहीत. तसेच या फिचरला वाय-फायद्वारे युजर्स वापरू शकणार नाहीत.
या नवीन फिचरमुळे तुम्ही नवीन डिव्हाईसवर लॉग इन केल्यावर तुमची चॅट हिस्टरी सेव्ह करण्यासाठी मेसेज येईल. व्हॉट्सअॅपकडून हे फीचर्स कधी लॉन्च करणार याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
अॅन्ड्रॉइड युजर्स चॅट हिस्टरी स्टोअर करण्यासाठी Menu > Settings > Chat settings मध्ये जाऊन हिस्टरी सेव्ह करू शकता.
या प्रक्रियेत तुम्ही तुमच्या फोनमधील मायक्रो एसडी कार्डमध्येही चॅट हिस्टरी सेव्ह करू शकता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.