मुंबई : चीनी स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पो भारतात आपला नवीन 'ओप्पो आर ९' हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. सोबतच 'ओप्पो आर ९ प्लस' या स्मार्टफोनही लॉन्च होण्याची शक्यता आहे.
५ एप्रिल रोजी हे दोन्ही फोन भारतात लॉन्च करण्याची तयारी कंपनीनं सुरू केलीय. या स्मार्टफोनची डिझाईन आयफोनची कॉपी आहे किंवा नाही? याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.
चीनमध्ये सध्या 'ओप्पो आर ९'ची किंमत जवळपास २८,६१५ रुपये आहे. भारतात याची किंमत काय असेल हेदेखील लवकरच स्पष्ट होईल.
डिस्प्ले : ५.५ इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले
प्रोसेसर : २ गिगाहर्टझ ऑक्टोकोर मिडियाटेक HELIO P 10 चिपसेट
रॅम : ४ जीबी
इंटरनल मेमरी : ६४ जीबी (मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्यानं १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते)
रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सल (f/2.2 अपर्चरसहीत)
बॅटरी : २,८५० मेगाहर्टझ