तुमच्या 'फिलिंग' शेअर करणं आता आणखी सोप्पं...

आता तुमच्या हातात कोणताही मोबाईल असो... तुम्ही फेसबुकवर आपल्या ‘फिलिंग’ तुमच्या मित्रांशी शेअर करू शकणार आहात.

Updated: Jul 9, 2014, 10:02 AM IST
तुमच्या 'फिलिंग' शेअर करणं आता आणखी सोप्पं...  title=

मुंबई : आता तुमच्या हातात कोणताही मोबाईल असो... तुम्ही फेसबुकवर आपल्या ‘फिलिंग’ तुमच्या मित्रांशी शेअर करू शकणार आहात.

जगभरातील नंबर वनवर असणारी सोशल नेटवर्किंग वेबसाईट लवकरच, आपल्या युझर्सना सर्व प्रकारच्या मोबाईल फोन्सवर आपल्या स्टेटससोबत आपली फिलिंग जोडण्याची सुविधा देणार आहे.

लवकरच, सर्व यूझर्सना आपल्या स्टेटससोबत ‘स्माइली’च्या माध्यमातून आपल्या भावना किंवा आपला मूड आपल्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करता येणार आहे. सध्या ही सुविधा कम्प्युटर आणि स्मार्टफोन यूझर्ससाठीच उपलब्ध आहे. पण, यापुढे सर्व फोनसाठी ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल.

यामध्ये, तुम्ही काय वाचत आहात, काय ऐकत आहेत, काय पाहत आहात किंवा काय खात आहात... आणि तुम्हाला हे करत असताना काय वाटतंय हे सगळं तुम्ही सांगू शकाल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.