मुंबई : अनेकांनी फेसबूकपासून दूर राहण्याचं अनेक वेळा ठरवलं असेल पण तुम्हाला असं करणं शक्यच झालं नसेल. एक आठवडा होत नाही की तुम्ही फेसबूक प्रोफाईल चेक करताच. असं करणारे तुम्ही एकटेच नाही तर अनेक जण आहेत.
फेसबूक सोडण्याचं ठरवल्यावरही तसं न करू शकणारे या जगात अनेक जण आहेत. कॉर्नेल विश्वविद्यालयाच्या एका सर्वेक्षणात आपण फेसबूकपासून का लांब राहू शकत नाही याची काही कारणं समोर आली आहेत.
अनेकांना फेसबूकचं व्यसन झाल्यामुळे किंवा त्यांची ती सवय झाल्यामुळे ते त्यापासून लांब राहू शकत नाही. एका व्यक्तीचं असं म्हणणं होतं की तो इंटरनेटवर गेला की नकलत तो अगोदर फेसबूक प्रोफाईल चेक करतो.
जस्ट या संस्थेने केल्या सर्वेक्षणात ५ हजार लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. ज्यामधून या गोष्टी समोर आल्या आहेत.