लंडन: स्मार्टफोनच्या वाढत्या विक्रीमुळं येत्या पाच वर्षांत ऑनलाईन पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होणार असं दिसतंय.
एका शोधात ही गोष्ट समोर आलीय. ब्रिटनमधील डिजिटल मार्केट शोध विशेषज्ञ कंपनी ज्यूनिपर रिसर्चनुसार, ऑनलाइन पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या पुढील पाच वर्षांमध्ये 42 टक्क्यांच्या जवळपास वाढ होऊ शकते,
हफिंग्टन पोस्ट कॅनडानं आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं की, 2020 पर्यंत पॉर्न व्हिडिओवर हिट्सची संख्या वाढून 19,300 कोटी होईल. यावर्षी पॉर्न व्हिडिओ वर 13,600 हिट्स आल्या आहेत. रिपोर्टनुसार 3जी, 4जी आणि वाय-फायनं व्हिडिओ आधारित सेवा अधिकच फास्ट केल्या आहेत. त्यामुळं चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ फास्ट स्ट्रीम होतात आणि वापरकर्त्यांसाठीचं काम सोप्पं झालं.
संशोधनाच्या परिणामानुसार एक स्मार्टफोन वापरकर्त्यानं या वर्षात सरासरी 348 पॉर्न व्हिडिओ पाहिल. रिपोर्टनुसार विकसनशील देशांमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत भरमसाठ वाढ असेल. ज्यूनिपर रिसर्च रिपोर्टनुसार आगामी काळात सदस्यतेवर आधारित पॉर्न सुद्धा झपाट्यानं वाढलीय.
(एजंसी इनपूटसह)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.