मुंबई : मोटोरोला या आंतरराष्ट्रीय कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय असलेल्या मोटो जी सेकंड जनरेशन फोनसाठी नवीन ६.० अँड्रॉइड मार्शमॅलो अपडेट आणले आहे.
तुम्ही अजून हे अपडेट केले नसेल तर लगेच करून घ्या. मोटोरोला सध्या असलेले अँड्रॉइडचे ५.०.२ वर्जनमध्ये अपडेट केले असून लेटेस्ट व्हर्जनची सुविधा आपल्या मोटो जी २ला दिली आहे.
तुम्हांला अजून याचे नोटिफिकेशन आले नसेल तर म्यॅनुअली फोन सेटिंगमध्ये जाऊन about phone ला क्लिक करा आणि सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या.
तुम्ही हा अपेडट करून घेतल्यावर तुमच्या फोनमधील सर्व अॅप्स, युजर सेंटिंग कायम राहणार आहे.
या नवीन अँड्रॉइ ६.० मार्शमॅलो व्हर्जनमध्ये गुगलने अनेक फिचर आणले आहे. त्यांनी सर्वात महत्त्वाचे बॅटरी लाइफ इम्प्रुव्ह करण्यावर भर दिला आहे.
युजर आता कोणतेही अॅप नव्या ऑप्टीमाइज मोडमध्ये कॉन्फिगर करू शकतो. ते एनेबन केल्यावर रन होतील अशी सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे फोन जेव्हा वापरता नसेल त्यावेळी त्यात होणारी अॅक्टीव्हिटी कमी होणार आहे. यामुळे तुमची बॅटरी लाइफ वाढण्यात मदत होणार आहे.
मार्शमॅलो या नव्या व्हर्जनमध्ये फोनमधील एसडी कार्डाचा वापर हा फोनमधील इंटरनर मेमरी वाढविण्यासाठी होऊ शकतो. याचा उपयोग अॅप लोड केल्यावर इंटरनर मेमरीवर जो ताण पडतो, ती लवकर भरून जाते. तसं होणार नाही.
विशेष नोट : या विशेष मोडमध्ये, संबंधीत मेमरी कार्ड हे फक्त त्या फोनसाठी वापरता येईल. ते इतर फोनमध्ये वापरता येणार नाही. तुम्हांला तसे वापरायचे असेल तर त्याला रिफॉरमॅट करावे लागेल.
यापूर्वीच्या व्हर्जनमध्ये तुम्हांला सिस्टिम एक्सेस परमिशन विनाकारण स्वीकाराव्या लागत होत्या. अॅप इन्स्टॉल करताना नेहमी ही परमिशन घ्यावी लागत असे. आता युजर्स स्वतः एखाद्या अॅपला इन्स्टॉलसाठी परमिशन allow किंवा deny करू शकतो. अॅपसाठी कॅमेरा यूज करण्याची परवानगी देणे हे तुमची प्रायव्हसी भंग होण्याचा धोका असतो. त्यामुळे हा निर्णय तुमच्यावर सोडला आहे.
फोनच्या रिंगटोन किंवा नोटीफिकेशनमध्ये खूप चांगले बदल करण्यात आले आहे. यात अलाऊ कॉल्स किंवा केवळ साउंड अलार्म, किंवा संपूर्ण सायलंट ठेवण्याची सुविधा आहे. हे तुम्हांला तुमच्या कामच्या वेळेनुसार सेट करता येणार आहे. तुम्ही मिटिंग किंवा इव्हेंटमध्ये असाल तर ते खूप उपयोगी होणार आहे.
हे मार्शमॅलोचे की फिचर आहे. गुगलने हे गेल्यावर्षी आपल्या अॅपमध्ये टाकले होते. या नव्या फिचरमध्ये तुम्ही एखाद्या अॅपमध्ये असताना तुम्हांला गुगल सर्च करायचे आहे, त्यावेळी तुम्ही होम की टॅप करून गुगल सर्च करू शकतात.
उदा. तुम्हांला व्हॉट्सअॅपवर एक ठिकाणाचा पत्ता आला तो तुम्ही सर्चमध्ये टाकून त्याचा मॅप शोधू शकतात. एखादे रेस्टॉरंट असेल तर गूगल कार्ड ओपन होऊन त्याचे रिव्ह्यू आणि रेटिंग्स तुम्हाला मिळू शकतात.