मुंबई : रेल्वे मंत्रालयानंतर पेट्रोलियम आणि टेलिकॉम मिनिस्ट्रीने ट्वीटर हँण्डलवर 'तक्रार निवारण' करण्यावर भर दिला आहे. मिनिस्ट्रीने यासाठी कंट्रोल रूमही सुरू केला आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय देखील या प्रकारे अडचणी सोडवण्यावर भर देत आहे.
पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या कंट्रोल रूममध्ये इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम तसेच हिदुस्तान पेट्रोलिअम या तीन कंपन्या, ऑफिशियल ट्वीटर हॅण्डलवर मिळणाऱ्या तक्रारींवर भर देत आहेत.
ऑफिसर पेट्रोलियम मिनिस्टर धमेंद्र प्रधान यांच्या ट्वीटर हॅण्डलवर नजर लावून असतात. @dpradhanBJP.
याबाबतीत धर्मेंद्र प्रधान म्हणतात की, प्रत्येक राज्यात ऑईल कंपन्यांचे ट्वीटर हॅण्डल लोकांकडे असतील.
देशभरातील लोक एलपीजी आणि केरोसीन वापरतात, तेव्हा लोकांशी आमचा यावर सरळ संपर्क असतो.
गॅस सिलेंडर मिळण्यास नेहमीच उशीर होत असल्याने, एका महिलेने पेट्रोलियम मिनिस्टर धमेंद्र प्रधान यांनी ट्वीट करून तक्रार केली, याचा लगेच परिणाम झाला आणि लोकल गॅस एजन्सीने महिलेच्या घरी लगेच सिलिंडर पोहोचवलं, तसेच यापुढे तुम्हाला वेळेवर सिलिंडर मिळेल असंही सांगण्यात आलं.
मुंबईत एका ग्राहकाचा एमटीएनएल फोन अनेक तक्रारी केल्यानंतरही ठिक होत नव्हता, तेव्हा टेलिकॉम मिनिस्टर रविशंकर प्रसाद यांना त्यांनी ट्वीट केलं, २४ तासांच्या आत फोन ठिक झाला आणि एमटीएनएलचे अधिकारी त्या ग्राहकाला पुष्पगुच्छ देखील घेऊन आले. मात्र एक फोन ठिक होण्यासाठी २४ तास हा कालवधी तसा जास्तच आहे.
टेलिकॉम मिनिस्ट्रीमध्ये दोन ऑफिससर्स अप्वाईंट करण्यात आले आहेत, हे ऑफिसर रविशंकर प्रसाद यांचं ट्वीटर हँडल @rsprasad वर नजर ठेवतात.
रविशंकर प्रसाद म्हणतात,
सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या समस्या सोडवणे हे आमचं काम आहे. तक्रारीचं नेमकं काय झालं, याविषयी अख्ख जग पाहतं.
फॉरेन मिनिस्ट्री देखील ट्वीटरवर अॅक्टीव्ह
मिनिस्ट्रीच्या ज्वाईंट सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहेत, सुषमा स्वराज यांच्यामते, ट्वीटरवर मेसेज आल्यानंतर पहिली रिअॅक्शन, पहिल्या पाच ते दहा मिनिटात झाली पाहिजे. सरकारी विभागात रेल्वेनंतर सर्वात जास्त फॉलोअर्स फॉरेन मिनिस्ट्रीला आहेत.
होम मिनिस्ट्री ट्वीटरवर अॅक्टीव्ह नाही....
होम मिनिस्ट्री टवीटरवर सध्या अॅक्टीव्ह नसल्याचं दिसून येत आहे, राजनाथ सिंग यांचा ट्वीट अकाऊंट तसं नसल्यासारखच आहे.
वास्तविक पाहता देशभरातील लोकांना पोलिसांच्या कामाविषयी तक्रारी आहेत.
जर आम्ही जास्त अॅक्टीव्ह असलो, तर आमचं काम जास्त वाढेल, आणि लोक म्हणतील की आम्हाला होम मिनिस्ट्रीने उत्तर नाही दिलं.
हेच एक कारण असावं की गृहमंत्रालय ट्वीटरवर येण्यापूर्वी विचार करत असावं.