मुंबई : राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजले आहेत. सरकारने 'नो हेल्मेट नो फ्युएल' धोरण अवलंबले आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना इंधन न देण्याचे निर्देश राज्य सरकारनं पेट्रोलपंप चालकांना दिले आहेत. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली.
अनेकांकडून या निर्णयाचा विरोध झाला तर अनेकांनी याचं स्वागतही केलं. पण अनेक जण असेही आहेत ज्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं. हेल्मेट फक्त दिखाव्यासाठी घेऊन काही जण पेट्रोलपंपावर जातील. पण याकडे अधिक गांभिर्याने बघण्याची गरज आहे. याबाबतच जागृत करणारा हा व्हिडिओ.
पाहा व्हिडिओ