मुंबई : तुमची गर्लंफ्रेंड किंवा आणखी कुणीही अगदी जवळची व्यक्ती तुमच्या बाजुला बसलेली आहे... पण, या घडीला तिच्या डोक्यात काय सुरु आहे, याचा मात्र तुम्हाला नखाइतकाही थांगपत्ता नाही... बरं, विचारलं तर योग्य उत्तर मिळेल की नाही याचीही खात्री नाही... तुम्हीही अशाच प्रसंगांतून जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीमधील वैज्ञानिकांच्या एका टीमनं एक नवं सिस्टम तयार केलंय. या सिस्टमचं नाव आहे… ‘कम्प्युटर ब्रेन टू ब्रेन कम्युनिकेशन’ या सिस्टमच्या मदतीनं आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये काय गोष्टी सुरू आहेत, हे जाणून घेणं शक्य होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या वैज्ञानिक टीममध्ये एक भारतीय वैज्ञानिक राजेश राव यांचाही समावेश आहे.
कसं काम करतं हे ‘ब्रेन टू ब्रेन कम्युनिकेशन’
ब्रेन टू ब्रेन कम्युनिकेशन सिस्टमद्वारे काही वेळातच एका मेंदूला दुसर्या मेंदूसोबत जोडलं जातं. यानंतर, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात सुरु असलेल्या विविध घडामोडी काही संकेतांच्या माध्यमातून जाणून घेऊ शकेल. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, ही प्रक्रिया इंटरनेटच्या माध्यमातून पूर्ण होईल. इंटरनेटच्या साहाय्याननं ब्रेन टू ब्रेन कम्युनिकेशनचा कम्प्युटराईज्ड पद्धतीनं लिंक जोडली जाईल.
कुणाला होणार याचा जास्त फायदा...
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, हे नवं तंत्र अनेक लोकांच्या उपयोगी पडू शकतं. कारण, बऱ्याचदा आई-वडिलांना आपल्या मुलांना समजून घ्यायचं असतं... अनेकांना आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना समजून घ्यायचं असतं. शिवाय, पॅरालाईज्ड पीडित व्यक्ती असतील तर अशा लोकांचं म्हणणं समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या कुटुंबांना मदतच होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.