कॅलिफोर्निया : फेसबुकने मेसेंजरच्या माध्यमातून कॉलिंग सुविधा सुरु केल्यानंतर आता व्हाट्सअॅप युजरसाठीही कॉलिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे युजर्सकरिता कॉल करणे शक्य झाले आहे.
व्हाट्सअॅपने आपल्या काही निवडक युजर्ससाठी व्हाईस कॉलिंगची चाचणी घेतल्यानंतर कॉल फिचर ही सुविधा सर्व युजर्सकरिता खुली करण्यात आली आहे.
ही सुविधा वापरणाऱ्या युजर्सना गुगल प्ले स्टोअरवरून व्हाट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे. व्हाट्सअॅपची नवी आवृत्ती प्रसिद्ध करण्यता आली असून त्यामध्ये 'व्हॉईस कॉलिंस फिचर' देण्यात आले आहे.
या फिचरअंतर्गत कॉल्स, चॅटस् आणि कॉन्टॅक्टस् असे तीन पर्याय देण्यात आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.