नवी दिल्ली : स्त्री-पुरुष यांना एकमेकांबद्दल आकर्षण असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. या आकर्षणाची कारणे अनेक असू शकतात. अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असेलेले पुरुष अधिक आवडतात. काही महिला उंच पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात. ही आहेत पाच कारणे
उंच पुरुष केवळ शारिरीकदृष्ट्याच नाही तर मानसिकदृष्ट्याही कणखर असतात. त्यामुळेच महिला अशा पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात.
उंच पुरुषांमुळे महिलांना त्यांच्यासोबत अधिक सुरक्षित वाटते.
अशा प्रकारचे पुरुष दुसऱ्यांवर अधिक दबदबा कायम राखण्यात माहीर असतात. महिलांना त्यांचा हा गुण अधिक भावतो.
अधिक उंचीचे पुरुषांचा फिटनेस अनेकदा स्त्रियांना भावतो. त्यामुळे अशा पुरुषांकडे त्या अधिक आकर्षित होतात. तसेच त्या स्वत:ही त्याच्याप्रमाणे फिट राहण्यासाठी प्रयत्न करतात.