अवकाशातील कचरा (Space Debris)

अमित जोशी कृत्रिम उपग्रहांचा कार्यकाल हा काही महिन्यांपासून ते 10 ते 15 वर्षांपर्यंत निश्चित केलेला असतो.सुरुवातीच्या मोहिमांमध्ये उपग्रह हे अनेकदा भरकटले जायचे किंवा हव्या त्या कक्षेत पाठवण्यास अपयश यायचे. तर अनेक उपग्रहांचा कार्यकाल संपल्यावर त्याचा वापर बंद केला जायचा.

Updated: Oct 22, 2011, 04:07 PM IST
 
 अमित जोशी
अवकाशातील कचरा 

विविध प्रकारचा कचरा मग तो घनकचरा असो, कारकाखान्यातून रसायनमिश्रीत तयार झालेला टाकावू द्रव पदार्थ असो, ई-कचरा असो किंवा किरणोत्सारी कचरा असो. कच-याचे विविध प्रकार आणि त्यामुळे निर्माण होणा-या समस्या आता सर्वच देशांची डोकेदुखी बनत चाललेल्या आहेत. विकसित किंवा भारत-चीन सारख्या विकसनशील देशात तर ई-कचरा आणि त्याची विल्हेवाट ही एक नवीन गंभीर समस्या बनली आहे. त्यात आता नव्या कच-याची भर पडत चालली आहे, तो म्हणजे अवकाशातीलकचरा. या कच-यामुळे अवकाश कार्यक्रम हाती घेतलेल्या देशांची झोप उडण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.
अर्थात अवकाशातील कचरा पृथ्वीबाहेरील वातावरणात, पृथ्वीच्या भोवती तयार होत असल्याने सर्वसामान्यांना याचा थेट फटका अजून तरी बसलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य याबद्दल अद्याप अनभिज्ञ आहेत.
वकाशातील कचरा कसा तयार होतो?

१९५७ मध्ये सोव्हिएत रशियाने स्फुटनिक हा पहिला कृत्रिम उपग्रह पाठवला आणि विज्ञानाचे  नवे दालनच खुले झाले. त्यापोठापाठ अमेरिकेनेही तोडीसतोड स्पर्धक म्हणून उडी घेतली. त्यानंतर इंग्लंड, कॅनडा, इटली, फ्रान्स, चीन, भारत अशा एकूण 53 देशांनी स्वबळावर किंवा दुस-या देशांच्या मदतीने आत्तापर्यंत तब्बल 6,500 पेक्षा अधिक विविध प्रकारचे उपग्रह सोडले आहेत. तर २५० पेक्षा जास्त मानवसहीत अवकाश मोहिमा आत्तापर्यंत झाल्या आहेत.

प्रक्षेपकाचे अवशेष

या सर्व मोहिमांत विविध प्रकारचे प्रक्षेपक किंवा रॉकेट वापरले जातात. साधारण तीन ते चार टप्प्यात रॉकेटमधील इंधनाचे ज्वलन होते. एका टप्प्याचे ज्वलन झाले की रॉकेटचा तो भाग मुख्य भागापासून वेगळा होतो आणि पुढच्या टप्प्याचे ज्वलन सुरु होते. हे भाग पृथ्वीच्या साधारण 160 किलोमीटरच्या वर राहिल्यास सहसा पृथ्वीवर परतत नाहीत. तर ते त्या उंचीवर पृथ्वीभोवती फिरत रहातात.
अनेकदा उंचावर गेल्यावर एखाद्या टप्पा पार करतांना किंवा सुरू होतांना दुर्घटना होते आणि रॉकेटचा स्फोट होतो त्यामुळेही अंतराळ कच-यात वाढ होते. तर काही मानवी मोहिमांत काही उपकरणे Space Walk  करतांना नियंत्रणातून सुटून ती अवकाशात गेल्याच्याही घटना आहेत. उदा. प्रसिद्ध अंतराळवीरंगना सुनिता विल्यम्सच्या हातून स्पेस वॉक करतांना कॅमेरा निसटला होता आणि तो आता पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरत आहे.

वापरात नसलेले कृत्रिम उपग्रह 

कृत्रिम उपग्रहांचा कार्यकाल हा काही महिन्यांपासून ते 10 ते 15 वर्षांपर्यंत निश्चित केलेला असतो.सुरुवातीच्या मोहिमांमध्ये उपग्रह हे अनेकदा भरकटले जायचे किंवा हव्या त्या कक्षेत पाठवण्यास अपयश यायचे. तर अनेक उपग्रहांचा कार्यकाल संपल्यावर त्याचा वापर बंद केला जायचा. असे अनेक वापरात नसलेले उपग्रह, भरकटलेले उपग्रह आजही पृथ्वीभोवती विविध कक्षेतून फिरत आहेत.

अवकाश कच-यामुळे नुकसान
१२ जुलै १९८९ ला इंग्लडने अवकाशात पाठवलेला  Olympus - 1 हा त्या वेळचा सर्वात मोठा दळणवळण उपग्रह एका छोट्या लघुग्रहाचा तुकडा आदळल्याने निकामी झाला.
24 जुलै 1996 ला Cerise नावाचा फ्रान्सचा छोटा कृत्रिम हेरगिरी उपग्रह (Micro Satellite ) हा Arian Rocket चा तुकडा आदळल्याने  निकामी झाला.रशियाचा Express AM11 नावाच्या उपग्रहाने २००६ मध्ये एका अज्ञात वस्तुची अवकाशात धडक बसल्याने कक्षा बदलली होती. सुदैवा
Tags: