'या' सुंदरीच्या समोर अनन्या-सुहानाही फेल, वयाच्या 49 व्या वर्षीही 'ती' दिसते अप्रतिम; सौंदर्य टिकवण्यासाठी दुधाने करते अंघोळ?

फिल्म इंडस्ट्रीपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अशा अनेक सुंदरी आहेत ज्या आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या ब्युटी टिप्सबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

| Jan 06, 2025, 09:37 AM IST

Guess This Reality TV Star: फिल्म इंडस्ट्रीपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अशा अनेक सुंदरी आहेत ज्या आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या ब्युटी टिप्सबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

 

1/7

Guess This Reality TV Star: फिल्म इंडस्ट्रीपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अशा अनेक सुंदरी आहेत ज्या आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या ब्युटी टिप्सबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.  

2/7

अनेक अभिनेत्री त्यांच्या ब्युटी टिप्सही चाहत्यांसोबत शेअर करतात, तर काही गोष्टी शेअर करणे टाळतही. आम्ही तुम्हाला अशाच एका सौंदर्यवतीबद्दल सांगणार आहोत, जी गेल्या वर्षी तिच्या रिॲलिटी शोमध्ये तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली होती. नुकतेच तिने तिच्या सौंदर्याचे रहस्यही उघड केले आहे.  

3/7

सुंदरांच्या सौंदर्यचे रहस्य

मलायका अरोरा पासून शिल्पा शेट्टी आणि माधुरी दीक्षित पर्यंत, चित्रपटसृष्टीमध्ये अशा अनेक सुंदरी आहेत ज्या वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही अतिशय सुंदर दिसतात. आजही त्या त्यांच्या सौंदयासोबत आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. अनेकदा चाहत्यांनाही तिच्या ब्युटी टिप्स जाणून घेण्याची उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सौंदर्याविषयी सांगणार आहोत, जिने वयाच्या 49 व्या वर्षीही अनन्या-सुहानाला सौंदर्यात मागे सोडले.

4/7

ही सुंदरी कोण आहे?

ही सुंदरी आहे 49 वर्षीय रिॲलिटी टीव्ही स्टार शालिनी पासी, जिने 2024 मध्ये गेल्या वर्षी नेटफ्लिक्स शो 'फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज' द्वारे आपली ओळख निर्माण केली आहे. ती तिच्या वेगळ्या आणि अनोख्या ब्युटी टिप्समुळे चर्चेत असते. या वयातही तिने आपले सौंदर्य आणि फिटनेस जपला आहे. तिच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा आहे, ज्याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.  

5/7

शोमध्ये उघड केली अनेक गुपिते

शालिनी पासीला 'फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज'मध्ये प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. याठिकाणी तिने तिचे प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ आणि ब्युटीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या शोदरम्यान शालिनीने दावा केला होता की ती दुधाने आंघोळ करते, ज्याबद्दल अलीकडेच तिच्या एका मुलाखतीदरम्यान एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. न्यूजलँड्रीला दिलेल्या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की ती खरोखर दुधाने आंघोळ करते का?

6/7

शालिनी खरंच दुधाने आंघोळ करते का?

शालिनीने उत्तर दिले, "मी दुधाने आंघोळ करत नाही. मला शोमध्ये काहीही स्पष्ट करायचे नव्हते. म्हणूनच ती जे काही विचारलं त्याला 'हो' असं उत्तर द्यायची. आमच्या भागात गाय, घोडे किंवा बकरी पाळण्यास मनाई आहे, त्यामुळे दुधाने आंघोळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." शालिनी ग्लॉइंग आणि हेल्दी स्किनसाठी घरगुती उपाय उत्तम मानतात. तिने सांगितले की ती घरगुती उपायांनी त्वचेची काळजी घेते.   

7/7

शालिनी करते होम रेमेडीज

शालिनी रोज बीटरूट स्मूदी पिते.जे तिच्या त्वचेला नैसर्गिक चमक देतात असे तिचे मानने आहे. याआधी शालिनी एका मुलाखतीत म्हणाली होती, "माझा नेहमी नेचर आणि साधेपणावर विश्वास आहे. माझ्या आई आणि आजीने मला स्वयंपाकघरातील पदार्थांपासून उपाय करायला शिकवले आणि मी ते माझ्या आयुष्यात स्वीकारायला सुरुवात केली. आता माझा त्यांच्यावर विश्वास आहे."  शालिनी खरोखरच एक DIY ब्युटी क्वीन आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिचे खूप चांगले फॅन फॉलोइंग आहे.