फक्त कोकणातचं हे असं काय तरी होवू शकतं! अशी स्पर्धा ना कधी पाहिली असेल ना कुठे झाली असेल

रत्नागिरीच्या अंत्रावली गावात नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. 

Aug 06, 2023, 21:27 PM IST

Konkan Ratnagiri News : शिमगा, पालखी आणि गणपती... कोकणी माणसाचा विक पाईंट. जगाच्या पाठीवर कुठेही असलं तरी शिमगा आणि गणपतीला गावी जाण्यासाठी कोकणही माणूस धडपड करतोच. फक्त शिमगा आणि गणपतीच नाही तर कोकणात अनेक पारंपरिक उत्सव आणि खेळ साजरे केले जातात. त्यापैकीच एक आहे ती नांगरणी स्पर्धा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात अंत्रावली गावात नांगरणी स्पर्धा पार पडली. 

 

1/7

सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या रत्नागिरीत ही अनोखी स्पर्धा पार पडसली.  कालबाह्य सामुहिक शेतीला बहर आणण्यासाठी स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. 

2/7

सध्याच्या घडीला सामूहिक शेती कालबाह्य होताना दिसून येत आहे. शिवाय नोकरी - धंदा निमित्त शहरांमध्ये गेलेला तरुण हळूहळू शेतीपासून लांब जात आहे. दरम्यान शेतीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. 

3/7

चिखलातून बैलजोडीला घेवून शेतात नांगरणी करण्याची ही स्पर्धा होती.  

4/7

या स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

5/7

यावेळी जिल्ह्यातल्या 50 हून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.

6/7

कालबाह्य सामुहिक शेतीला बहर आणण्यासाठी या नांगरणी स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होते. 

7/7

रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात अंत्रावली गावात नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.