PHOTO : वडील चितेवर अन् 9 वर्षांचा 'हा' गायक; गरिबी आणि संकटाशी लढून आज संपत्ती आहे 2000 कोटींच्या घरात
Entertainment : आज आम्ही ज्या गायकाबद्दल बोलत आहोत, तो संगीत क्षेत्राचा सम्राट मानला जातो. जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा चांगली माणसेही हिंमत गमावतात. खूप कमी लोक असतील ज्यांनी संकटांच्या सर्वात मोठ्या वादळाचा सामना करून आपले नशीब लिहिलं असेल आणि सुपरस्टार बनले असतील.
1/10
याच मोजक्याच लोकांमध्ये नाव येते ए आर रहमान यांचं. ज्यांचे लहानपणीचे नाव एएस दिलीप कुमार होते. आज 6 जानेवारीला 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. संगीत जगतातील सम्राट म्हणून ओळखले जाणारे अल्लाह रखा रहमान म्हणजेच एआर रहमान यांना त्यांच्या कारकिर्दीत सहा राष्ट्रीय पुरस्कार, दोन ऑस्कर आणि बाफ्टा पुरस्कारांपासून ते गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि पद्मभूषणपर्यंतचे सन्मान मिळाले आहेत.
2/10
3/10
4/10
5/10
एआर रहमानने एकदा O2India यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील त्या भयानक काळाची कहाणी सांगितली होती. एआर रहमानने सांगितले होते की, त्यांचे बालपण अजिबात सामान्य नव्हतं. त्याचे वडील आजारी होते, आणि म्हणून त्यांनी आपला बहुतेक वेळ रुग्णालयात घालवला. त्याचे वडील सुमारे 4 वर्षे गंभीर आजारी राहिले आणि नंतर एके दिवशी त्यांचे निधन झालं.
6/10
तो दिवस आठवला की ए आर रहमान आजही थरथर कापतात. त्यांनी सांगितलं की, 'मी त्यांचे अंतिम संस्कार केले होते. त्यावेळी मी 9 वर्षांचा होतो आणि चौथीत शिकत होतो. ही एकच आठवण आहे जी माझ्या मनातून कधीच जात नाहीय. पण, मला आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत झाली आहे. मला ते सर्व काही दिले जे सामान्य मुलाला मिळत नाही.
7/10
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी एआर रहमान यांच्या खांद्यावर आली आणि त्यांनी शाळाही सोडली. घरात कमावणारे कोणी नव्हते. कसे जगायचे? त्यामुळे एआर रहमानला शाळा सोडावी लागली. ते पुन्हा कुटुंबाला मदत करू लागले. पैसे कमवण्यासाठी ए.आर. रहमानने वडिलांची संगीत उपकरणे भाड्याने देण्यास सुरुवात केली.
8/10
ए.आर. रहमान यांना संगीताचा वारसा मिळाला असल्याने लहानपणापासूनच त्यांचा कल याकडे होता. संगीतकार एमके अर्जुनन यांनी त्यांच्या कारकिर्दीला मदत केली. ते रहमानच्या वडिलांचे मित्र होते आणि त्याच्यासोबत कामही केलं होतं. एआर रहमानने करिअरला सुरुवात केली तेव्हा त्यांचा पहिला पगार 50 रुपये होता. हळूहळू तो सत्र संगीतकार आणि नंतर कीबोर्ड वादक बनले. यानंतर ए आर रहमान यांनी टीव्हीसाठी जिंगल्स बनवायला सुरुवात केली.
9/10
10/10