2070 कोटींचा सुपरहिट चित्रपट, वयाच्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमधून संन्यास; आता धर्माच्या नावे चेहराही दाखवत नाही

खूप कमी सेलिब्रिटी आहेत ज्यांचं नशिब अभिनय क्षेत्रात त्यांची साथ देतं आणि येताच ते स्टार होतात. अभिनयाचं कौशल्य आणि नशिबाची साथ मिळाली आणि 5 वर्षांपूर्वी एका अभिनेत्रीला फेम मिळालं. तिच्या सगळ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. तर आज आपण अशात अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत जिच्या चित्रपटाचा कोणताही रेकॉर्ड आजवर कोणी मोडू शकलं नाही. 

| Dec 05, 2024, 18:00 PM IST
1/7

ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून जायरा वसीम आहे. जायरा ही कश्मिरी मुस्लिम कुटुंबातून आहे. तिचे वडील हे बॅंकेत काम करायचे तर याच वर्षी जानेवारी महिन्यात जायरानं तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. 

2/7

जायराची आई ही शिक्षिका आहे. जायरानं बॉलिवूडमध्ये फक्त 'दंगल', 'सीक्रेट सुपरस्टार' आणि 'द स्काई इज पिंक' या तीन चित्रपटांमध्ये काम केलं. या तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती.

3/7

सगळ्यात आधी 'दंगल' या चित्रपटात दिसली होती. त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. सगळ्यात आधी जायरानं गीता फोगाटच्या बालपनीची भूमिका साकारली होती. या भूमिकेत जायरानं इतका अप्रतिम अभिनय केला की सगळ्यांना तिच्या अभिनयाची भुरळ पडली. 

4/7

या चित्रपटानं वर्ल्डवाइड 2070 कोटींचं कलेक्शन केलं. हा भारतातील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटानं अजून रेकॉर्ड मोडलेला नाही. इतकंच नाही तर या चित्रपटानं आमिर खानच्या पीके चित्रपटाचा रेकॉर्ड देखील या चित्रपटानं मोडला होता. 

5/7

या चित्रपटाली भूमिकेसाठी जायरा वसीमला सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेत्रीचा नॅशनल फिल्म पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं होतं. 

6/7

त्या चित्रपटानंतर जायरानं 2017 मध्ये 'सीक्रेट सुपरस्टार' या चित्रपट केला. या चित्रपटात जायरानं मुस्लिम मुलीची भूमिका साकारली आहे. 15 कोटींचा बजेट असणाऱ्या या चित्रपटानं 905 कोटींची कमाई केली होती. 

7/7

त्यानंतर 2019 मध्ये जायरा 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात दिसली होती. यानंतर तिनं अभिनय क्षेत्राताला रामराम केला. जायरा ही 19 वर्षांची होती आणि आता ती 24 वर्षांची असून सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचा चेहरा दिसेल असे फोटो शेअर करत नाही. तिची Sustenance नावाच्य कम्युनिटीसाठी काम करते जी महिलांसाठी कार्यरत आहे.