BMC कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी, पाहा काय आहेत घोटाळ्याचे आरोप?

Jun 21, 2023, 19:25 PM IST
1/7

ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाणांच्या घरावर ईडीनं छापा टाकल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झालेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सूरज चव्हाण यांच्या घराबाहेर उपस्थित आहे. यादरम्यान कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली.

2/7

ईडी कारवाईवरून संजय राऊतांनी सरकारला इशारा दिलाय...लोकांना टार्गेट करून ईडी कारवाई केली जातेय...शिंदे गटात, भाजपात गेलेल्यांना का वगळलं जातंय? असा सवाल करत सत्ता बदलली तर फासे उलटे पडू शकतात असा इशारा दिलाय...

3/7

ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीनं घातलेल्या छाप्यांवर काय राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

4/7

कोरोना काळात मुंबईतील दहिसरमध्येही कोविड सेंटर उभारलं संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांनी हे उभारल्याचा आरोप आहे. 

5/7

सुजित पाटकरांनी यासाठी रातोरात कंपनी स्थापन केल्याचा आरोप असून कंपनीचं नाव लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस आहे.

6/7

कोविड सेंटर चालवण्यासाठी बीएमसीचं सुजित पाटकर यांना कंत्राट देण्यात आलं. ईडीनं टाकलेल्या छाप्यात कंत्राटाबाबत तपशील समोर आल्याची माहिती आहे.

7/7

 कंत्राट मिळाल्याच्या वर्षभरानंतर कंपनीच्या खात्यात 32 कोटी रूपये जमा झाल्याचं सांगितलं जात आहे.