गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये फराह खाननं ठेवली Ed Sheeran साठी खास पार्टी, 'या' सेलिब्रिटींनी लावली हजेरी

लोकप्रिय हॉलिवूड गायक ईडी शिरीन (Ed Sheeran) सध्या भारतात आहे. त्याच्यासाठी बॉलिवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका आणि निर्माती फराह खाननं एका वेलकम पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. चला तर टाकूया एक नजर...

Diksha Patil | Mar 16, 2024, 17:15 PM IST
1/7

गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये पार्टीचे आयोजन

फराह खाननं या पार्टीचे आयोजन गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये केलं होतं. मुंबईच्या वांद्रे परिसरातील पाली हिल परिसरात हे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये आतापर्यंत अनेक पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. 

2/7

फरहान अख्तर आणि अनुषा दांडेकर

यावेळी लोकप्रिय गायक आणि अभिनेका फरहान अख्तर आणि त्याची मेहूण अनुषा दांडेकर यांनी देखील हजेरी लावली होती. 

3/7

राजकुमार राव आणि पत्रलेखा

राजकुमार राव आणि पत्रलेखा हे दोघेही फराह खानचे खूप चांगले मित्र आहेत. ते नेहमीच एकमेकांच्या घरी कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. या पार्टीतही ते दोघे दिसले. 

4/7

अदिती रॉय हैदरी

अदिती रॉय हैदरी ही फराह खानसोबत या पार्टीत आली होती. पार्टीच्या सुरुवातीला ते दोघं पोहोचले होते.

5/7

चंकी पांडे

चंकी पांडे यांनं त्याची पत्नी भावना पांडेसोबत या पार्टीत हजेरी लावली होती. 

6/7

आर्यन खान

आर्यन खान यावेळी डॅशिंग लूकमध्ये दिसला होता. त्याच्या आईच्या रेस्टॉरंटमध्ये असलेल्या फराहच्या पार्टीत त्यानं देखील इतर सेलिब्रिटींप्रमाणे हजेरी लावली होती. 

7/7

अरशद वारसी आणि मलायका अरोरा

यावेळी अरशद वारसीनं त्याच्या पत्नीसोबत हजेरी लावली होती. तर मलायकानं ही तिची मैत्रीण असलेल्या फराह खानच्या पार्टीत हजेरी लावली होती.