धक्कादायक! कंटेन्मेंट झोनमध्ये घरफोडी

Jun 09, 2020, 21:57 PM IST
1/6

नागपुरात  कंटेन्मेंट झोनमध्ये घरफोडीची धक्कादायक  घटना घडली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या नाईक तलाव परिसरात क्वारंटाईन करण्यात आलेल्या कुटुंबाच्या घरी चोरट्यांनी हात साफ  केल्याने खळबळ उडाली आहे.

2/6

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार 40 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

3/6

नाईक तलाव परिसरात 77 पेक्षा जास्त  कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वस्तीतील अनेक कुटुंब इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहेत. 

4/6

अनेकांच्या घराला कुलूप लागले आहे. त्यापैकीच एक कुटुंबाच्या घरी चोरट्यांनी हात साफ करत हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

5/6

धक्कादायक बाब म्हणजे कंटेन्मेंट झोन असल्याने या भागात वाढीव पोलीस बंदोबस्त असतानाही घटना घडली आहे.  

6/6

कोरोना संसर्ग इतक्या मोठया प्रमाणात झालेल्या परिरातील चोरट्यानी केलेली ही चोरी अनेकांसाठी संकट निर्माण करू शकते. शिवाय नागरिकांमध्ये यामुळं भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. (अमर काणे- नागपूर)