'माझं आणि विराटचं नातं कसं आहे हे संपूर्ण...'; टीम इंडियाच्या 'संभाव्य कोच'चं 'गंभीर' विधान

Gautam Gambhir Relationship With Virat Kohli: विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये 2023 च्या आयपीएलमध्ये झालेला वाद यंदाच्या पर्वात मिटल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता विराटबरोबरच्या नात्यासंदर्भात विचारलं असता गंभीरने अगदी सूचक विधान केलं आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची दाट शक्यता असतानाच गंभीरने हे विधान केलं आहे. 

Swapnil Ghangale | May 31, 2024, 15:43 PM IST
1/8

Gautam Gambhir Relationship With Virat Kohli

विराट कोहली आणि गौतम गंभीरसारखे खेळाडू एकमेकांना भेटल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना चर्चेसाठी काहीतरी मिळणार हे जणू समिकरणचं झालं आहे. यंदाच्या आयपीएलच्या पर्वात म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये दोघांचा ब्रोमान्स चांगलाच चर्चेत राहिला.

2/8

Gautam Gambhir Relationship With Virat Kohli

विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रमुख खेळाडू म्हणून यंदाच्या पर्वातही चमकला तर गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सचं मेंटॉर पद स्वीकारत संघाला थेट जेतेपद मिळून दिलं.   

3/8

Gautam Gambhir Relationship With Virat Kohli

कोलकात्याने जेतेपद पटकावल्यामुळे गौतम गंभीरला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागण्याचा मार्ग अधिक सुखकर झाल्याची चर्चा आहे. आयसीसीच्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपत असल्याने त्याची जागा गंभीर घेणार अशी दाट शक्यता आहे.  

4/8

Gautam Gambhir Relationship With Virat Kohli

आयपीएल संपल्यानंतर गंभीरने त्याच्या दृष्टीने ट्रॅव्हीस हेड आणि अभिषेक शर्माने केलेली विक्रमी पार्टनरशीप आणि मयांक यादवने टाकलेला भन्नाट स्पेल या दोन गोष्टी पर्वातील सर्वोत्तम क्षण होते असं म्हटलं आहे. 

5/8

Gautam Gambhir Relationship With Virat Kohli

गंभीरने आरसीबीच्या संघाचंही कौतुक केलं आहे. एकामेगामाग एक सहा सामने जिंकत 0.02 टक्के शक्यता असतानाही आरसीबीने प्लेऑफमध्ये मजल मारल्याचं गंभीरने कौतुक केलं. कोलकात्याला 2 वेळा कर्णधार म्हणून आणि आता मेंटॉर म्हणून जेतेपद पटावणाऱ्या गंभीरने कोहलीबरोबर रिलेशन कसं आहे हे सुद्धा सांगितलं.  

6/8

Gautam Gambhir Relationship With Virat Kohli

"जे काही समज आहेत ते सत्यापेक्षा फार वेगळे आहेत. माझं आणि विराटचं नात कसं आहे हे देशाला सांगण्याची गरज मला वाटतं नाही," असं गंभीरने विराटबरोबरच्या नात्यासंदर्भात भाष्य करताना म्हटलं आहे.

7/8

Gautam Gambhir Relationship With Virat Kohli

"मला जितका व्यक्त होण्याचा हक्क आहे तितकाच त्यालाही आहे. आमचा आमच्या संघांना जिंकून देण्याचा प्रयत्न असतो. माझं आणि विराटचं नातं कसं आहे हे संपूर्ण देशाला मसाला (गॉसिप) देण्यासाठी नक्कीच नाहीये," असं गंभीरने 'स्पोर्स्टसकिडा'शी बोलताना सांगितलं.

8/8

Gautam Gambhir Relationship With Virat Kohli

2023 साली विराट आणि गंभीरमध्ये आयपीएलच्या सामन्यात मैदानामध्ये बाचाबाची झाली होती. यावरुन नंतर विराटने, "माझ्या वागण्यामुळे अनेकजण दुखावले गेले. मी नवीन ला मिठी मारली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौती भाईंनी मला मिठी मारली. आमच्यातला वाद संपला आणि तुम्हाला मसाला मिळणार नाही हे स्पष्ट झालं," असं एशिएन पेंट्सच्या कार्यक्रमात म्हटलं होतं.