सोने स्वस्त तर चांदी चकाकली! पाहा काय आहे आजचा प्रति तोळा भाव

Gold-Silver Rate Today : आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या पूजेसाठी वारकरी गर्दी करतात. अशा परिस्थितीत सोन्या-चांदीची जोरात खरेदी सुरु असून जर तुम्ही पण सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजे 29 जून 2023 रोजी भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली असून चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे.   

Jun 29, 2023, 11:47 AM IST
1/7

Gold-Silver Rate Today

सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली असून चांदी मात्र दोन दिवसात महागली आहे. सोने-चांदीने फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात नवीन रेकॉर्ड केले होते.

2/7

Gold-Silver Rate Today

पण मे महिन्यात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्यानंतर ही घसरण जून महिन्यात पण कायम राहिली आहे. 62,000 रुपयांचा टप्पा गाठणाऱ्या सोने आता 59,000 रुपयांच्या आसपास विकले जात आहे. 

3/7

Gold-Silver Rate Today

तर चांदीत ही घसरण कायम होती पण आज मात्र चांदीने पुन्हा उसळी घेतली असून जाणून घ्या सोने-चांदीचा काय आहे आजचा प्रति तोळा भाव... 

4/7

Gold-Silver Rate Today

28 जून रोजी सोन्याचा भाव 320 रुपयांनी घसरला असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,110 रुपयांवर आला. तर 27 जूनला सोन्याची किंमत 59,430 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

5/7

Gold-Silver Rate Today

तर 24 आणि 26 जून रोजी किंमती अनुक्रमे 160 आणि 100 रुपयांनी महागल्या होत्या. 23 जून रोजी 430 रुपयांनी किंमती उतरल्या.  59,170 रुपये किंमत होती.   

6/7

Gold-Silver Rate Today

तर सकाळी सोन्याचा दर 58298 रुपये प्रति तोळा होता. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात 147 रुपयांची घसरण झाली आहे.

7/7

Gold-Silver Rate Today

गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. चांदीच्या दरात सुमारे 3000 रुपयांची घसरण झाली. पण गेल्या दोन दिवसांपासून चांदीमध्ये सुमारे हजार रुपयांनी वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 71,900 रुपये झाला.