Hanuman Jayanti : 105 फूट उंच हनुमान मूर्तीला साडेतीनशे किलोचा पुष्पहार...

देशासह राज्यभरात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे. हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशातच बुलढाण्यातील 105 फुटी हनुमानाच्या मूर्तीला तब्बल साडेतीनशे किलोंचा हार घालण्यात येणार असल्याचे सध्या याची जोरदार चर्चा सुरुय.

Apr 06, 2023, 12:22 PM IST
1/7

World famous 105 feet tall Hanuman idol

बुलढाणा जिल्ह्यात आज हनुमान जयंती सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. हनुमान जयंतीनिमित्त नांदुरा येथे 105 फुटी विशालकाय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

2/7

Nandura Buldhana Hanuman Jayanti

राष्ट्रीय महामार्ग 6 वर असलेली ही भारतातील आणि जगातील सर्वात उंच हनुमान मूर्तींपैकी एक असल्याचे म्हटले जाते.

3/7

buldhana hanuman jayanti

हनुमान जयंतीच्या निमित्ताने या 105 फूटी विशालकाय मूर्तीवर रिमोटच्या सहाय्याने पुष्पहार चढवला जाणार आहे.

4/7

105 Feet Big Hanuman Statue

105 फूटी हनुमानाच्या मूर्तीवर चढवण्यात येणाऱ्या हाराचे वजन साडेतीनशे किलो असल्याचे सांगण्यात आले आहे.

5/7

Swami Mahamandaleshwar Janardhan Hariji

या विशालकाय मूर्तीला स्वामी महामंडलेश्वर जनार्दन हरिजिंच्या हस्ते हा भव्य पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.  

6/7

Three and a half hundred kilo garland

अनेक तासांच्या मेहनीनंतर हा महाकाय हार तयार करण्यात आला आहे. झेंडु, गुलाब, शेवंतीच्या फुलांचा वापर करुन हा साडेतीनशे किलोंचा हार तयार करण्यात आला आहे.

7/7

buldhana hanuman mandir

नांदुरा येथील हनुमानाच्या या विशालकाय मूर्तीला पाहण्यासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते आणि आज हनुमान जयंती निमित्त मोठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.