घटस्फोटानंतर अँजेलिना जोलीला मिळाले 'इतके' कोटी, नेटवर्थमध्ये दीपिकाला टाकले मागे

हॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांचा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीला सेटलमेंटमध्ये इतके कोटी मिळाले आहेत.

| Jan 05, 2025, 17:37 PM IST
1/7

हॉलिवूड कपल

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांना हॉलिवूडची सर्वात सुंदर कपल म्हणून ओळखले जात होते. मात्र, 8 वर्षांनंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. 

2/7

वेगळं राहण्याचा निर्णय

2014 मध्ये अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांनी लग्न केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. 

3/7

686 कोटी

8 वर्षांपूर्वी तिने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर प्रदीर्घ भांडणानंतर दोघेही वेगळे झाले आहेत. या सेटलमेंटमध्ये अभिनेत्रीला 686 कोटी रुपये मिळालेत. 

4/7

लग्नाआधीचा करार

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांना 6 मुलं आहेत. लग्नाआधी दोघांनी एक करार केला होता. ज्यामध्ये मृत्यू झाला किंवा घटस्फोट झाल्यास संपत्ती शेअर करण्याबाबत चर्चा झाली होती. 

5/7

मिस्टर अँड मिसेस स्मिथ

अँजेलिना आणि ब्रॅड पिट हे दोघेही हॉलिवूडचे प्रसिद्ध आणि मोठे स्टार आहेत. दोघांची भेट 2004 मध्ये 'मिस्टर अँड मिसेस स्मिथ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. 

6/7

अभिनेत्याची प्रतिक्रिया

त्यानंतर दोघांनी एकमेकांना 10 वर्षे डेट केले. त्यानंतर दोघांनी 10 वर्षांनंतर लग्न केलं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, घटस्फोटानंतर अभिनेत्याने डोक्यावरील भार कमी झाल्याचं म्हटले आहे.   

7/7

दीपिका नेटवर्थ

अँजेलिना जोलीला मिळालेल्या सेटलमेंटबाबत बोलायचे झाले तर दीपिका पदुकोणची नेटवर्थ तिच्या पेक्षा कमी आहे. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, दीपिकाची एकूण संपत्ती 500 कोटी आहे.