दरवर्षी किती कमावतो Rohit Sharma? किती आहे मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचं नेट वर्थ

येत्या 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होतेय. सर्वात लोकप्रिय टीम मुंबई इंडियन्सची धुरा ही रोहित शर्माकडे आहे. आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचं नेट वर्थ किती आहे ते पाहुयात.

Mar 23, 2023, 19:07 PM IST
1/5

आयपीएल 2022 मध्ये, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने 16 कोटींमध्ये कायम ठेवलं होतं. यापूर्वी आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 15 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलेलं.

2/5

2015 साली रोहितने मुंबईमध्ये आलिशान डिझायनर घर खरेदी केलं. या घराची किंमत सुमारे 30 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. वरळीमध्ये आहुजा टॉवर्समध्ये फोर बीएचके फ्लॅट खूप लक्झरी आहे.

3/5

रोहित शर्माकडे असलेल्या कार या सर्वोत्तम आहे. ज्यामध्ये BMW, Audi, Porsche आणि Mercedes Benz यांचा समावेश आहे. रोहित शर्माची मर्सिडीज सुमारे 88.2 लाख रुपये तर बीएमडब्ल्यू सीरिजची कार 59.8 लाख रुपये आहे. याशिवाय लॅम्बोर्गिनी सुमारे तीन कोटी रुपयांची आहे.

4/5

रोहित शर्मा क्रिकेट सामने, आयपीएल, जाहिराती, सोशल मीडिया आणि ब्रँड जाहिरातींद्वारे पैसे कमावतो. रोहित शर्माने एका महिन्यात 1.2 कोटी रुपये कमावतो. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दरवर्षी 16 कोटींपेक्षा अधिक कमावतो.

5/5

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माची एकूण संपत्ती 24 मिलियन डॉलर आहे. भारतीय चलनानुसार रोहित शर्माची एकूण संपत्ती 180 कोटी रुपये आहे.