IPL 2021: या 5 भारतीय दिग्गज खेळाडूंसाठी असू शकते ही शेवटची आयपीएल

Feb 09, 2021, 11:08 AM IST
1/5

अंबाती रायुडू

अंबाती रायुडू

35 वर्षीच्या अंबाती रायुडू चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) महत्वाचा खेळाडू आहे, त्याला मॅच विनर देखील बोललं जातं. पण यलो आर्मीचा मागील हंगाम काही खास नव्हता. रायडू देखील काही खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे यंदाचा त्याचा हा शेवटचा सीजन असण्याची शक्यता आहे.

2/5

पीयूष चावला

पीयूष चावला

पीयूष चावला याला २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने (CSK) ने 6.75 कोटी रुपयांत खरेदी केले होते, परंतु २०२० मध्ये तो संघाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याने 7 सामन्यात केवळ 6 विकेट्स घेतल्या. कदाचित त्याची गोलंदाजीची धार आता कमी झाली असेल. त्यामुळे त्याच्यासाठी ही हा शेवटचा सीजन असून शकतो.

3/5

रॉबिन उथप्पा

रॉबिन उथप्पा

रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) ला मागील वर्षी राजस्थान रॉयल्स (RR) ने 3 कोटींना खरेदी केलं होतं. यूएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये 12 सामन्यात त्याने फक्त 196 रन केले. आता तो चेन्नई सुपरकिंग्स (CSK) कडून खेळताना दिसणार आहे. 35 वर्षाचा उथप्पा आता काही खास कामगिरी करताना दिसत नाहीये. त्यामुळे त्याच्यासाठी देखील हा शेवटचा हंगाम असू शकतो.  

4/5

हरभजन सिंग

हरभजन सिंग

40 वर्षांचा हरभजन सिंग (Harbhajan Singh) 2020 मध्ये आयपीएलमध्ये खेळला नाही. या वर्षी त्याला चेन्नई सुपरकिंग्स (CSK) ने रिलीज केलं आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये त्याची बेस प्राईस २ कोटी आहे. त्याच्यासाठी देखील हा शेवटचा हंगाम असू शकतो.

5/5

एमएस धोनी

एमएस धोनी

आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये एमएस धोनी (MS Dhoni ) ची टीम चेन्नई सुपरकिंग्स (CSK)ने काही खास कामगिरी केली नाही. इतिहासात पहिल्यांदाच सीएसकेला पराभवाचा इतका मोठा धक्का बसला. धोनीने या सीजनमध्ये फक्त 200 रन केले होते. या दरम्यान तो एकही अर्धशतक करु शकलेला नाही. 2021 मध्ये तो चेन्नईचं नेतृत्व करेल असं त्याने आधीच जाहीर केलं आहे. धोनी आता 40 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी देखील हा सीजन शेवटचा ठरु शकतो. यानंतर तो रिटायरमेंट घेण्याची शक्यता आहे.