पालकांच्या 'या' चुका बहीण भावाला बनवू शकतात शत्रू

Jun 02, 2023, 18:52 PM IST
1/7

child

जेव्हा कोणाच्या घरी दुसरे किंवा तिसरे मूल जन्माला येते तेव्हा पालक मुलांना सांगतात की तू मोठा भाऊ किंवा बहीण होणार आहेत. पालकांना वाटतं यामुळे मुलांना आनंद झालाय. पण असं नसते. दुसरं कोणी आल्याने पालकांचे आपल्यावरील प्रेम विभागलं जाईल असे मुलांना वाटतं. काही वेळा ते खरंसुद्धा होतं आणि हेच त्यांच्यातील वादाचं कारण बनतं. 

2/7

child parents

दुसरं तिसरं अपत्य झाल्यानंतर मोठ्या अपत्याच्या वस्तू किंवा नव्या वस्तू त्याच्याकडे वळत्या केल्या जातात. पालकांना याचं काही वाटत नाही. पण मुलांवर कधी कधी याचा परिणाम होतो

3/7

child anger

लहान मुलांना राग का येतो हे सांगता येत नाही, पण ते रागावून, वस्तू फोडून, ​​रडून आपली नाराजी व्यक्त करतात. अशा परिस्थितीत पालकांनी याचं कारण शोधायला हवं

4/7

Giving ones things to another is the biggest mistake

पालकांची सर्वात मोठी चूक म्हणजे आपल्या मुलांना एकमेकांच्या गोष्टी शेअर करण्यास भाग पाडणे. कधी कधी मुलांना त्यांच्या गोष्टी दुसऱ्यांना द्यायच्या नसतात आणि अशावेळी अडचण निर्माण होते.

5/7

Option of Sharing and Caring

अशावेळी पालकांनी मुलांना त्याच्या भावंडांशी आणि इतर मुलांशी प्रेमाने गोष्टी शेअर करायला शिकवा. मुलाचे वागणे पाहून, त्यांनी त्याच्याशी वागले पाहिजे आणि त्याच्यावर जबरदस्ती करू नये.

6/7

To take ones side in a quarrel

मुलांमध्ये जेव्हा कधी भांडण होते, अशा परिस्थितीत पालकांनी त्यांना प्रेमाने समजावून सांगावी. दोघांनाही बाजूला घेऊन त्यांची चूक सांगावी. असे न केल्यास एखाद्याला आपल्यालाच लक्ष्य केले जातय असं वाटू शकतं.

7/7

Dont insult someone

मुलांमध्येही स्वाभिमान असतो आणि इतर कोणत्याही मुलासमोर शिव्या देणे, मारणे याचा त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्याच्या मनात भाऊ बहिणीबद्दल आणि पालकांबद्दलही नाराजी निर्माण होऊ लागते.