वयाने 21 वर्ष मोठ्या नेत्याबरोबर लग्न केल्यानंतर अभिनेत्री झाली आई; मात्र 4 महिन्यांमध्येच...

Tv Actress Married 21 Year Older Political Leader: एका लोकप्रिय मालिकेमधून घराघरातील ओळखीचा चेहरा झालेल्या या अभिनेत्रीने तिच्या वैवाहिक आयुष्यासंदर्भात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. आपण स्वच्छेने वयाने  21 वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीबरोबर विवाह केल्याचं सांगतानाच या अभिनेत्रीने विवाहनंतरचा घटनाक्रम मुलाखतीत सांगितला आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे पाहूयात... 

Swapnil Ghangale | Jun 02, 2023, 18:15 PM IST
1/13

tv actress snehal rai

'इश्क का रंग सफेद' या हिंदी मालिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री स्नेहल रायने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये स्नेहलने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे.

2/13

tv actress snehal rai

10 वर्षांपूर्वी मी स्वइच्छेने माझ्याहून वयाने 21 वर्ष मोठ्या असलेले राजकीय नेते माधवेंद्र राय यांच्याबरोबर लग्न केलं होतं, असं 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत स्नेहलने म्हटलं.

3/13

tv actress snehal rai

माधवेंद्र राय यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर आपल्याला एक मुलगा झाला होता, असं स्नेहलने या मुलाखतीत सांगितलं. मात्र जन्मानंतर या मुलाचा 4 महिन्यात मृत्यू झाला असंही स्नेहल म्हणाली. 

4/13

tv actress snehal rai

स्नेहलने आपल्या मुलाचं नाव रुद्र असं ठेवलं होतं. 4 महिन्यांमध्येच रुद्रचा मृत्यू झाल्याने स्नेहलला मोठा धक्का बसला होता.

5/13

tv actress snehal rai

"मी स्वत:ला एक आठवडा रुममध्ये बंद करुन घेतलं होतं. केवळ मी वॉशरुमला जायचे आणि बेडवर येऊन पडायचे," असं स्नेहल म्हणाली.

6/13

tv actress snehal rai

"मी खाणं-पिणंही सोडलं होतं. मला माझं आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं. माझं वजनही अगदी 40 किलोंपर्यंत आलं होतं. मी एखाद्या सांगड्याप्रमाणे दिसत होती," असं स्नेहलने या मुलाखतीत सांगितलं.

7/13

tv actress snehal rai

"रुद्र आला. त्याने मला आई होण्याची जाणीव करुन दिली आणि तो आमच्यातून निघून गेला," असं अगदी भावनिक होऊन स्नेहलने म्हटलं.

8/13

tv actress snehal rai

यामधून सावरण्यासाठी एका मित्राने मदत केल्याचं स्नेहल म्हणाली.

9/13

tv actress snehal rai

मुलाखतीत स्नेहलने, "यानंतर माझ्या एका मित्राने मला यातून बाहेर येण्यास मदत केली. त्याने मला आवरुन तयार व्हायला सांगितलं. नंतर तो मला मरिन ड्राइव्हला घेऊन गेला. तिथे जाऊन मी फार रडले आणि माझ्या मनातील दु:ख हलकं केलं," असंही सांगितलं.

10/13

tv actress snehal rai

"मी एकदा अनाथ आश्रमातही गेले होते. तिथे एक लहान मुलं माझ्या जवळ आलं आणि त्याने मला मिठी मारुन 'आई' म्हटलं. त्या मिठीमुळे मला पुन्हा एकदा आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळाली," असं स्नेहलने सांगितलं.

11/13

tv actress snehal rai

"रुद्रच्या मृत्यूनंतर रुद्रकल्प क्रिएशन्स एनजीओ आम्ही सुरु करत आहोत. मी केवळ एका नाही तर 1 ते 2 हजार मुलांची आई बनून त्यांना चांगलं आयुष्य देऊ इच्छिते," अशी इच्छा स्नेहलने बोलून दाखवली.

12/13

tv actress snehal rai

तसेच आपल्याला गरजू मातांना मदत करायची असल्याचंही स्नेहलने सांगितलं.

13/13

tv actress snehal rai

"मी अशा महिलांना मदत करु इच्छिते ज्यांना इच्छा असूनही आपल्या मुलांचं चांगल्यापद्धतीने संगोपन करता येत नाही," असं स्नेहल म्हणाली.